'रानडे इन्स्टिट्यूट' बाबत चर्चा करणार

कुलगुरू डॉ.नितीन करमळकर; रानडे इन्स्टिट्यूट बचाव समितीचे निवेदन
'रानडे इन्स्टिट्यूट' बाबत चर्चा करणार
'रानडे इन्स्टिट्यूट' बाबत चर्चा करणारsakal
Updated on

पुणे : रानडे इन्स्टिट्यूट (rande Institute) मध्ये सर्व पदविका अभ्यासक्रम सुरू राहणार आहे. ते अधिक उत्तम प्रकारे कसे चालवता येतील. तसेच विद्यार्थ्यांना अधिक दर्जेदार शैक्षणिक सुविधा कशा मिळतील, यासाठी पत्रकार क्षेत्रातील लोकांबरोबरच पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे, अशी माहिती सावित्रीबाई फुले (savitribai phule) पुणे विद्यापीठाचे (pune univercity) कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी दिली आहे. (Will discuss Ranade Institute Nitin Karmalkar)

विद्यापीठाचे संज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या विभागाला अर्थात रानडे इन्स्टिट्यूटला माध्यम व संज्ञापन अभ्यास विभागात विलीन करुन डिपार्टमेंट ऑफ कम्युनिकेशन, जर्नालिझम अँड मीडिया स्टडीज, असा नवा विभाग तयार करण्यात येण्याची प्रक्रिया प्राथमिक स्वरुपात सुरू आहे. रानडे इन्स्टिट्यूट पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक संकुलात स्थलांतरित करण्याच्या प्रस्तावावर माजी विद्यार्थी, विद्यार्थी संघटना आणि काही पत्रकारांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत रानडे इन्स्टिट्यूट बचाव समितीच्या सदस्यांनी डॉ. करमळकर यांची भेट घेउन, प्रस्तावाला विरोध असल्याचे सांगितले. प्रस्ताव मागे न घेतल्यास, आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात यावेळी देण्यात आला.

'रानडे इन्स्टिट्यूट' बाबत चर्चा करणार
पुणे : कोव्हॅक्सिनचे साडे सहा हजार डोस उपलब्ध

डॉ. करमळकर म्हणाले," दोन वर्षाचा एम इन जेएमसी अभ्यासक्रम शैक्षणिक संकुलात सुरू करण्याबाबत विभागातील विद्यार्थी आणि प्राध्यापकांशी चर्चा करण्यात येतील. या चर्चेनुसार पुढची दिशा ठरविण्यात येईल. या संपूर्ण प्रक्रियेत विद्यार्थ्यांचे नुकसान न होता, समाजाला दिशा दाखविणारे उत्तम पत्रकार कसे घडतील यासाठी प्रयत्न करण्यात येईल." इन्स्टिट्यूट च्या भूखंडासंबंधीच्या चर्चेला उत्तर देताना डॉ. करमळकर म्हणाले," संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभाग अणि परकीय भाषा विभाग असे दोन विभाग तेथे आहेत. या संपूर्ण जागेबाबत कोर्टात प्रकरण सुरू आहे. त्यामुळे एका विभागाचे स्थलांतर करणे आणि दुसऱ्या विभागाला तेथेच ठेवणे शक्य नाही. संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागही तेथेच राहणार आहे." भूखंडाबाबत जे प्रश्न व शंका निर्माण केल्या जातात, त्याला सध्यातरी काही अर्थ नाही, असे डॉ. करमळकर यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.