Bhushi Dam Lonavala: पुण्यातील एकाच कुटुंबातील ५ जण भुशी डॅममध्ये गेले वाहून, २ मृतदेह बाहेर काढण्यात यश

Bhushi Dam Lonavala News: शिवदूर्ग मित्र आणि शहर पोलिसांच्या मदतीने शोधमोहिम राबवली जात आहे. स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन सेवांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेतली आहे.
Bhushi Dam Lonavala News in marathi
Bhushi Dam Lonavala News in marathi esakal
Updated on

लोणावळ्यात वर्षाविहारासाठी गेलेल्या एका कुटुंबातील पाच जण भुशी डॅममध्ये वाहून गेल्याची भीती आहे. यामध्ये ४ लहान मुले आणि १ महिला यांचा समावेश आहे. हे सर्वजण पुण्यातील रहिवासी आहेत. भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील वॉटर फॉल, जो रेल्वेचा वॉटर फॉल म्हणून ओळखला जातो, तिथे हे अन्सारी कुटुंब वर्षाविहाराचा आनंद लुटत होते. पाय घसरुन हे सर्वजण वाहून गेल्याची भिती आहे. धबधब्याचे पाणी भुशी धरणात येते. त्यामुळे तिथे पाच जणांच्या शोधकार्याला सुरुवात झाली आहे.

शिवदूर्ग मित्र आणि शहर पोलिसांच्या मदतीने शोधमोहिम राबवली जात आहे. स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन सेवांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेतली आहे. शोधमोहिमेत प्रगत उपकरणे आणि तंत्रज्ञानाचा वापर केला जात असून, या पाच जणांच्या शोधासाठी संपूर्ण प्रयत्न सुरू आहेत.

ही घटना घडताना, स्थानिकांनी आणि पर्यटकांनी ही दुर्घटना पाहिली. त्यांच्या माहितीनुसार, कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांना वाचवण्याचा प्रयत्न केला, पण पाण्याच्या वेगामुळे त्यांचा प्रयत्न निष्फळ ठरला. या घटनेमुळे स्थानिक आणि पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Bhushi Dam Lonavala News in marathi
Viral Video: पाच कोटींचा पूल आठवड्यातच कोसळला, पाहा व्हिडिओ

भुशी धरण परिसर हा वर्षाविहारासाठी प्रसिद्ध आहे आणि दरवर्षी पावसाळ्यात अनेक पर्यटक इथे येतात. मात्र, पावसाळ्यात पाण्याच्या वेगामुळे आणि धबधब्याच्या तीव्रतेमुळे अशा दुर्घटनांचा धोका वाढतो. प्रशासनाने पर्यटकांना सुरक्षिततेच्या सूचना दिल्या आहेत आणि धोकादायक ठिकाणी जाण्यास मनाई केली आहे.

या दुर्दैवी घटनेनंतर, अन्सारी कुटुंबातील इतर सदस्य आणि नातेवाईक दुःखात बुडाले आहेत. प्रशासनाने त्यांना आवश्यक त्या मदतीचे आश्वासन दिले आहे. शोधकार्य लवकरात लवकर यशस्वी होईल अशी अपेक्षा आहे.

Bhushi Dam Lonavala News in marathi
Sambhaji Bhide: ड्रेस घातलेल्या महिलांनी... अभिनेत्री अन् वटसावित्री पूजेबद्दल संभाजी भिडेंचे वादग्रस्त वक्तव्य

लोणावळ्यातील भुशी डॅमजवळील धबधब्यात एक महिला आणि चार मुलं बुडाली आहेत. 2 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. पाचही जण एकाच कुटुंबातील असून ते पुण्यातील सय्यद नगर परिसरातील असल्याची माहिती पुण्याचे एसपी पंकज देशमुख यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.