Pune Crime: तिसरीही मुलगीच होत असल्याने घरीच केले ऑपरेशन, 24 वर्षीय महिलेचा मृत्यू; इंदापूरमधील घटना

Woman died after a abortion performed at residence :मिळालेल्या माहितीनुसार, महिलेचे लग्न २०१७ मध्ये झाले होते. महिलेला दोन मुली आहेत. ती तिसऱ्यांदा गरोदर होती. पोलिसांना संशय आहे की, महिलेला तिसऱ्यांदा देखील मुलगी होत असल्याचं कुटुंबाला कळालं होतं.
foetus
foetus
Updated on

Pune Woman Dies After Abortion Performed At Home

Pune News: पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका २४ वर्षीय महिलेचा घरीच गर्भपात केला गेल्याने मृत्यू झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी पती, सासरा यांना अटक केली आहे. तसेच सासू विरोधात देखील गुन्हा दाखल केला आहे. 'टाइम्स ऑफ इंडिया'ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

पोलिसांच्या तपासात आढळून आलंय की, चार महिन्याच्या भ्रूणाचा मृतदेह कुटुंबाच्या शेतात पुरण्यात आला होता. ज्या खासगी डॉक्टरने ऑपरेशन केले आहे, त्याची देखील चौकशी सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

foetus
Pune Crime : लग्नाचे अमिष दाखवून तरूणीवर बलात्कार; लोणी काळभोरमध्ये एकावर गुन्हा दाखल

मिळालेल्या माहितीनुसार, महिलेचे लग्न २०१७ मध्ये झाले होते. महिलेला दोन मुली आहेत. ती तिसऱ्यांदा गरोदर होती. पोलिसांना संशय आहे की, महिलेला तिसऱ्यांदा देखील मुलगी होत असल्याचं कुटुंबाला कळालं होतं. त्यामुळे त्यांनी ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला होता.

सोमवारी अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे महिलेची तब्यत गंभीर बनली होती. त्यामुळे महिलेला पुढच्या दिवशी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पण, त्याठिकाणी महिलेचा मृत्यू झाला. यासंदर्भातील माहिती इंदापूर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

foetus
Pune Crime : वनराज आंदेकर खून प्रकरण; प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या समोर होणार आरोपींची ओळख परेड

मृत महिलेच्या भावाने याप्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला आणि याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.भ्रूणाचा मृतदेह आढळला असून ते पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आलं आहे. इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी कलम ९१,९० आणि ८५ भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

राहुल भिमराव धोत्रे ( वय २८ वर्षे),लक्ष्मी भिमराव धोत्रे,भिमराव उत्तम धोत्रे ( वय ५० वर्षे तिघे रा. वडापूरी, ता.इंदापूर) अशी आरोपींची नावे आहेत. ऋतुजा राहुल धोत्रे ( वय २३ वर्षे,रा.वडापूरी) असे मयत झालेल्या दुर्देवी विवाहितेचे नाव आहे.या प्रकरणी तिचा भाऊ विशाल शंकर पवार (वय २५ वर्षे, रा.पिंपरद,ता.फलटण जि.सातारा) याने इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.