Accident News: बेशिस्त बाईकचालकांमुळे पायी चालणाऱ्यांना डोकेदुखी, भरधाव बाईकच्या धडकेत महिलेचा दुर्दैवी मृत्यू

कर्वेनगरात बेफाम गाडी चालवणाऱ्या युवकाने महिलेला उडवलं; प्रकार CCTVमध्ये कैद
Accident News
Accident NewsEsakal
Updated on

पुणे शहर परिसरात वारंवार भीषण अपघाताच्या बातम्या येत असतात. अतिवेगात गाड्या चालवणे. वाहतुकीचे नियम न पाळणे असे एक ना अनेक कारणे असतात. अशातच बेफाम पणे वाहन चालविणाऱ्या व सायलेन्सर व कर्णकर्कश हॉर्न मधून आवाज काढणाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी सातत्याने होत असते. (Latest Marathi News)

पुणे शहरात कर्वेनगर परिसर व उपनगरामध्ये अल्पवयीन मुलांकडून बेफाम पद्धतीने गाड्या चालवल्या जातात. हा बेफामपणा एका महिलेच्या जीवावर बेतला असून तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून पोलिसांकडून या युवकावर कारवाई करण्यात आली आहे.(Latest Marathi News)

Accident News
Crime News: एकनाथ शिंदेंच्या शिवसेना शाखाप्रमुखाची हत्या का झाली? पोलिसांनी लावला छडा

हिंगणे होम कॉलनी येथे बेफामपणे वाहन चालविणाऱ्या व सायलेन्सर व कर्णकर्कश हॉर्न मधून आवाज काढणाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी रहवाशी करत आहेत. कर्वेनगर येथील हिंगणे होम कॉलनीत सध्या अनेक तरुण बेफाम पणे गाड्या चालवत आहेत, जोरजोरात कर्कश हॉर्न वाजवत आहेत, बुलेटच्या सायलेन्सर मधनं फटाकडे वाजवत आहेत, गाड्या रेस करत आहेत ,या सगळ्याचा परिसरातील नागरिकांना भयंकर त्रास होत आहे.(Latest Marathi News)

Accident News
Road Accident : भीषण अपघातात 7 इंजिनियर विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू, तर 6 जण जखमी

बेफाम गाड्या चालवणाऱ्यावर कडक कारवाई करावी तसेच अशा प्रकारचे अपघात टाळण्यासाठी याच्यावर ठोस अशी उपाययोजना करणे फार गरजेचे आहे, जनजागृती करणे, ठीक ठिकाणी बोर्ड बॅनर लावणे ही काळाची गरज आहे. महत्त्वाच्या ठिकाणी स्पीड ब्रेकर करणं जरी अडचणीचे ठरणार असलं तरी सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे आहे , विना विलंब स्पीड ब्रेकर करण्यात यावेत अशी मागणी केली जात आहे.(Latest Marathi News)

Accident News
Crime News: एकतर्फी प्रेमातून १९ वर्षीय मुलीचं अपहरण; तणावाखाली येऊन आई-वडिलांनी उचललं टोकचं पाऊल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.