Pune Crime : पतीच्या विवाहबाह्य संबंधामुळे महिलेने संपविले स्वतःचे जीवन

पतीचे विवाहबाह्य संबंध आणि सततच्या छळाला कंटाळून एका महिलेने गळफास घेऊन संपविले स्वतःचे जीवन.
Crime
Crimesakal
Updated on

पुणे - पतीचे विवाहबाह्य संबंध आणि सततच्या छळाला कंटाळून एका महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना हडपसर भागातील भेकराईनगर परिसरात शनिवारी (ता. ७) घडली.

तेजश्री आकाश उदमले (वय २२, रा. शिक्षक कॉलनी, भेकराईनगर, फुरसुंगी) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत तेजश्रीची आजी देऊबाई पांडुरंग नेटके (वय ६५, रा. कोरेगाव, ता. कर्जत, जि. अहमदनगर) यांनी रविवारी (ता. ८) हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून आकाश अशोक उदमले (वय २५) याच्याविरूद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.