Wagholi Accident : वाघोलीत अवजड वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील महिला ठार; 12 दिवसात अपघातात 7 जणांचा बळी

अज्ञात अवजड वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाल्याची घटना पुणे नगर महामार्गावर वाघोलीतील आव्हाळवाडी फाट्यावर घडली.
woman killed in collision with heavy vehicle in Wagholi 7 people killed in accidents in 12 days
woman killed in collision with heavy vehicle in Wagholi 7 people killed in accidents in 12 daysSakal
Updated on

वाघोली : अज्ञात अवजड वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाल्याची घटना पुणे नगर महामार्गावर वाघोलीतील आव्हाळवाडी फाट्यावर घडली. 12 दिवसात वाघोली व परिसरात सात जणांचा अपघातात बळी गेला. संगीता बाळासाहेब कांबळे (वय ३७, रा. थेऊर) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी आर्यन कांबळे याने फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांबळे या दुचाकीवर जात होत्या. मागून आलेल्या अवजड वाहनाची त्यांच्या दुचाकीला धडक बसली. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यु झाला. ही घटना मंगळवारी (दि.७) सकाळी पावणे सातच्या सुमारास घडली. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोणीकंद थेऊर या अष्टविनायक महामार्गावर इकोकार व कंटेनर यांच्या मध्ये धडक होवून तिघांचा मृत्यू झाला. पुणे नगर महामार्गावर सळई घेवून उभ्या असलेल्या ट्रकला कार धडकल्याने कार चालकाचा मृत्यू झाला. लोणीकंद थेऊर या अष्टविनायक महामार्गावर एका ट्रकची धडक बसून बुलेट वरील तरुणाचा मृत्यू झाला.

तर पुणे नगर महामार्गावर वेगवेगळ्या अपघातात दुचाकीवरील तरुणी व महिलेचा अज्ञात वाहनांच्या धडकेत मृत्यू झाला. अनेक दुचाकी धारकांचा सकाळच्या वेळी अपघातात बळी जात आहे. सकाळी सर्वच अवजड वाहनांचा वेग मर्यादेपेक्षा अधिक असतो. धडक दिल्यानंतर ही वाहने सरळ निघून जातात.

केवळ या अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल होतो. मात्र त्या वाहन चालकांचा शोध लागत नाही. पुणे नगर महामार्गावर सिग्नल्स वर सी सी टीव्ही कॅमेरे बसविण्याची गरज आहे. जेणे करून वाहतूक नियम मोडणाऱ्यावर जरब तर बसेलच शिवाय अपघाताच्या घटना ही सी सी टीव्हीत कैद होवून वाहनांचा शोध लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.