पुणे - नवीन भाडेकरू शोधायचे असेल तर ओळखीच्या लोकांना कळवा, सोशल मीडियासह विविध ठिकाणी जाहिरात द्या आणि मग भाडेकरू मिळणार, अशी आताची स्थिती आहे. भाडेकरू निश्चित झाल्यानंतर तो वागायला चांगला आहे का, तो वेळेत भाडे देतो का, त्याची वागणूक कशी आहे, तो आपली फसवणूक तर करणार नाही ना, असे अनेक प्रश्न मालमत्ता असलेल्या मालकांच्या मनात उपस्थित होतात. या प्रश्नांचे उत्तर एका महिलेच्या स्टार्टअपने शोधले असून, त्यांनी भाडेकरूच्या अनुषंगाने विविध माहिती असलेले एक कार्डच तयार केले आहे.