Share Trading : महिलेला जादा नफ्याचे आमिष पडले महागात

शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ
Share Trading
Share Trading esakal
Updated on

पुणे : शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीवर जादा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून चोरट्यांनी धानोरी येथील एका महिलेची सात लाख रुपयांची फसवणूक केली. शहरात सध्या शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली सायबर चोरट्यांकडून आर्थिक फसवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे.

Share Trading
Nashik News : शहर परिसरात तिघांनी गळफास घेत संपवले जीवन; एकाचे अवघ्या ३ महिन्यापूर्वीच झाले लग्न

या संदर्भात एका ३६ वर्षीय महिलेने विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी जिल आणि रॉबर्ट या दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी धानोरी येथील महिलेला शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणावर नफा मिळवून देतो, असे आमिष दाखवले. त्यानंतर या महिलेला सोशल मीडियावरून लिंक पाठवली. ती लिंक क्लिक करण्यास सांगून त्यांच्या कंपनीचे ॲप डाऊनलोड करण्यास लावले. आरोपींनी ट्रेडिंग करण्यासाठी त्या महिलेचे खाते उघडले. त्यानंतर या खात्यावरून विविध कंपन्यांचे शेअर्स आणि आयपीओ घेण्यास भाग पाडले.

Share Trading
Nashik News : परस बागेसाठी फळ, फूल रोपांना पसंती; पावसाच्या आगमनानंतर विक्री जोमाने

आरोपींनी महिलेला जादा नफा मिळत असल्याचे भासवून बॅंक खात्यात पैसे भरण्यास सांगितले. त्यानुसार या महिलेने वेळोवेळी सात लाख १५ हजार रुपये खात्यात जमा केले. परंतु आरोपींनी महिलेला मुद्दल किंवा कोणताही मोबदला दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनी लाँड्रिंग चौकशीची भीती दाखवून फसवणूक -

‘मनी लाँड्रिंगमध्ये तुमच्या आधार कार्डचा वापर झाला आहे. रिझर्व्ह बॅंकेकडून चौकशी करण्यात येईल,’ अशी धमकी देवून सायबर चोरट्यांनी हडपसरमधील एका व्यक्तीची सहा लाख रुपयांची फसवणूक केली. याबाबत साडेसतरा नळी, हडपसरमधील एका व्यक्तीने (वय ४६) फिर्याद दिली आहे. त्यावरून हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.