अज्ञात व्यक्तींनी केलेल्या गोळीबारात महिलेचा मृत्यू

pune.jpg
pune.jpg
Updated on

येरवडा(पुणे) : वडगावशेरी येथील इंद्रमणी सोसायटीत दोन अज्ञात व्यक्तींनी केलेल्या गोळीबारात एकता ब्रिजेश भाटी (वय ३४, मूळगाव गोएडा, उत्तरप्रदेश) यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. गुन्ह्याचे कारण अद्याप अस्पष्ट असून आरोपींना शोधण्यासाठी तीन पथके रवाना झाल्याची माहिती येरवड्याचे सहायक पोलिस आयुक्त गणेश गावडे यांनी दिली.

इंद्रमणी सोसायटीतील धनदीप इमारतीमध्ये बुधवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास दोन अज्ञात व्यक्तींनी एकता भाटी यांच्या घराची बेल वाजवली. एकता बाहेर आल्यानंतर एकाने त्यांच्यावर जवळून गोळी झाडली. ही गोळी ह्यदयाजवळ लागल्याने त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या. गोळीचा आवाज ऐकून त्यांचे पती ब्रिजेश बाहेर आले. मात्र आरोपी दुचाकीवरून पळून गेले. ब्रिजेश यांनी एकता यांना हडपसर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारा दरम्यान त्यांना मृत्यू झाला.

भाटी दाम्पत्य गेली दोन वर्षांपासून इंद्रमणी साेसायटीत भाड्याने राहत होत्या. त्या आयटी कंपनीतील युवकांना जेवणाचे डबे पुरवित होत्या. गेल्या दोन तीन महिन्यांपासून ग्राहक वाढल्यामुळे त्यांनी आणखी दोन सदनिका भाड्याने घेतल्या होत्या. डबे पोचविण्यासाठी त्यांच्याकडे दोन कामगार होते. तर कधी त्या मोटारीने डबे पोचवित असल्याची माहिती शेजाऱ्यांनी दिली. त्यांना सहा वर्षांची दोन जुळी मुले आहेत. त्यांचा स्वभाव मनमिळावू व शांत होता. त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे त्यांच्या शेजाऱ्यांनी हळहळ व्यक्त केली.

‘‘एकता भाटी यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपींना शोधण्यासाठी तीन पथके रवाना झाली आहेत. गुन्ह्याचे अद्याप कारण स्पष्ट झाले नाही. गुन्हे शाखा, चंदननगर पोलिस ठाणे समांतर तपास करीत आहेत. भाटी राहत असलेल्या घरासमोरील व वडगावशेरी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणीचे काम सुरू आहे.’’
- गणेश गावडे, सहायक पोलिस आयुक्त, येरवडा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.