Varvand Crime : महिला वनरक्षकाला शिवीगाळ व दमदाटी; यवत पोलीस ठाण्यात तीघांवर गुन्हा दाखल!

बेकायदा खोदकाम रोखण्यासाठी गेलेल्या महिला वनरक्षकास शिवीगाळ, दमदाटी करून शासकीय कामात अडथळा केल्याचा धक्कादायक प्रकार घडला.
Crime
Crimesakal
Updated on

वरवंड - दौंड तालुक्यातील वरवंड येथे वनक्षेत्रांमध्ये जलवाहिनीसाठी सुरू असलेले बेकायदा खोदकाम रोखण्यासाठी गेलेल्या महिला वनरक्षकास शिवीगाळ, दमदाटी करून शासकीय कामात अडथळा केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

ठेकेदार अमोल भोईटे व ढमाले (संपूर्ण नाव नाही समजले) तसेच एक व्यक्ती रा. पाटस, ता. दौंड, जि. पुणे अशी गुन्हा दाखल केलेल्या व्यक्तींची नावे आहे. याबाबत यवत पोलिसांनी माहिती दिली. वरवंड वन परिमंडल कार्यक्षेत्रातील वरवंड हद्दीत वनक्षेत्र मोठे आहे. गुरुवारी (दि. २९) वनरक्षक शितल मेरगळ व वनमजुर अरूण बापुराव मदने हे गस्त घालत होते.

दुपारी ३ वाजण्याच्या आसपास वनक्षेत्रांमध्ये एक जे.सी.बी. मशीन जलवाहिनी साठी चारी खोदताना निदर्शनास आले. त्यांनी तेथे जावुन चारीची पाहणी केली. वनरक्षक मेरगळ यांनी काम करीत असलेल्या कामगारांना विचारणा केली. त्यावेळी ठेकेदार अमोल भोईटे हे संबधीत ठिकाणी आले.

ठेकेदार भोईटे यांना सदर खोदकामा बाबत विचारणा केली असता, त्यांनी वरंवड गावचे जलजीवन योजना अंतर्गत पिण्याची जलवाहिनीसाठी काम सुरू आहे. या चारीमध्ये काळ्या रंगाची जलवाहिनी ही वरवंड गावाची असुन पांढरा रंगाची ही वाखारी ग्रामपंचायत गावची आहे असे सांगितले.

यावेळी वनरक्षक मेरगळ यांनी फक्त वरवंड गावचे जलजीवन मिशन योजना अंतर्गत पिण्याची जलवाहिनीच्या खोदकामासाठी वनविभागाची रितसर परवानगी आहे. तुम्ही वाखारी गावाची जलवाहिनी चे काम कसे करता. वनविभागाची एका गावासाठी परवानगी असताना दुसऱ्या गावासाठी बेकायदा काम करता येणार नाही.

हे काम थांबवा असे सांगत जे. सी. बी मशीन ताब्यात घेतले. दौंड वनविभागाच्या कार्यालयाकडे घेऊन जाण्यासाठी जात असताना त्याठिकाणी अचानक ढमाले नावाचा व्यक्ती आला. नंतर ठेकेदार अमोल भोईटे व यांचा भाचा व ढमाले यांनी जेसीबी मशीन घेऊन जाण्यासाठी मज्जाव केला. तसेच ढमाले यांनी तुम्ही मला पैसे मागितले अशी तुमची खोटी तक्रार करतो असे म्हणत हुज्जत घालत दमदाटी केली.

तसेच ठेकेदार अमोल भोईटे यांनी धक्का बुक्की करून शिवागाळ करीत जे. सी. बी. मशीन घेवुन पळून नेले. याबाबत वनरक्षक शितल मेरगळ यांनी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सर्व प्रकार सांगितला. वनरक्षक मेरगळ यांनी दिलेल्या फिर्यादी वरून यवत पोलीस ठाण्यात ठेकेदार अमोल भोईटे, ढमाले व ठेकेदार भोईटे यांचा भाचा यांच्या विरूध्द सरकारी कामात अडथळा निर्माण करणे शिवीगाळ व धक्काबुकी केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

या घटनेचा अधिक तपास पाटस पोलीस करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.