Pune News: तलवारबाजी, लाठीकाठीने पूर्वी महिला शारिरिक स्वास्थ्य राखत होत्या. हल्ली ही जागा योगा, मेडिटेशनने घेतली आहे. त्यामुळे महिला मानसिकदृष्ट्या कणखर होत असल्याचे 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी' या चित्रपटातील कलाकारांनी सांगितले.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व राजाराम महाराज यांच्यानंतर स्वराज्य रक्षणाची धुरा ताराराणी यांनी समर्थपणे सांभाळली. त्यांचा इतिहास महाराष्ट्राला 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी' या चित्रपटाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे.
या चित्रपटातील कलाकारांनी शनिवारी 'स्वास्थ्यम्' उपक्रमास भेट देत प्रेक्षकांशी दिलखुलास गप्पा मारल्या. या वेळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, सुरभी हांडे, अभिनेता आशय कुलकर्णी, निर्माते अक्षय बर्दापूरकर व दिग्दर्शक राहुल जाधव उपस्थित होते.
सोनाली म्हणाली, "चित्रपटसृष्टीतील माझ्या १५ वर्षांच्या काळातील ताराराणी ही भूमिका म्हणजे मैलाचा दगड आहे. कारण, यापूर्वी मी 'हिरकणी'मध्ये ऐतिहासिक भूमिका साकारली आहे. पण आता थेट भोसले घराण्यातील व्यक्तीची भूमिका साकारण्याची संधी मला मिळाली आहे, याचा मनस्वी आंनद वाटतो."
ऐतिहासिक चित्रपट साकारताना कथा निवडून अचूक मांडणी करणे, हे निर्माता म्हणून माझ्यासाठी खूप महत्वाची जबाबदारी होती. जयसिंगराव पवार यांच्या कादंबरीवर आधारित या चित्रपटाची निर्मिती केल्याचे बर्दापूरकर यांनी सांगितले.
मराठी चित्रपट इतर भाषांमध्येही भाषांतरीत झाले पाहिजेत. त्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्याची तयारी असल्याचे जाधव यांनी सांगितले. सुरभी व अक्षय हेही आपल्या भूमिकेबदद्ल भरभरून बोलले. दरम्यान, सोनाली हिने छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित गारद म्हटली. यावेळी प्रेक्षकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.
'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी' चित्रपटातील कलाकारांनी प्रेक्षकांशी संवाद साधला. यावेळी (डावीकडून) अभिनेत्री सुरभी हांडे, दिग्दर्शक राहुल जाधव, निर्माते अक्षय बर्दापूरकर, ताराराणीची भूमिका साकारलेली अभिनेत्री सोनाली कुलकर्णी व अभिनेता आशय कुलकर्णी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.