परमिट रूम, बियर बार व लॉज बंद करण्यासाठी महिलांचा नारायणगावात मोर्चा

परमिट रूम, बियर बार व लॉज बंद करण्यासाठी महिलांचा नारायणगावात मोर्चा
Updated on

नारायणगाव : येथील नारायणगाव- कोल्हे मळा रस्त्यालगत असलेल्या सुविधा रेसिडेन्सी हाऊसिंग सोसायटीच्या ऍमिनिटी जागेत अनधिकृत सुरू करण्यात आलेल्या हॉटेल गॅलेक्सी परमिट रूम,बियर बार व लॉज बंद करण्याच्या मागणीसाठी हाऊसिंग सोसायटीच्या महिला व नागरिकांनी आज दुपारी येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय व नारायणगाव पोलिस स्टेशनमध्ये मोर्चा काढला होता. गॅलेक्सी इन परमिट रूम,बियर बार व लॉज मध्ये सुरू असलेल्या अवैध व्यवसायामुळे व तळीरामांच्या धांगडधिंगाण्यामुळे येथील १०९ सदनीकाधारक त्रस्त झाले आहेत. भरवस्तीत सुरू असलेला येथिल परमिट रूम,बियर बार व लॉज बंद न झाल्यास नारायणगाव ग्रामपंचायत व येथील नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल .असा इशारा या वेळी देण्यात आला. या बाबतचे निवेदन येथिल राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय व नारायणगाव पोलिस स्टेशनमध्ये देण्यात आले.या वेळी सरपंच योगेश पाटे, ग्रामपंचायत सदस्य राजेश बाप्ते, सोसायटी मधील परवीन इनामदार, राजश्री लाड,शैला काळे, नम्रता उनवणे, भरती मडके,लक्ष्मी आठवले,पुष्पलता बांगर, राधा बढे, अनिता काळे, सुरेश पटेल आदी उपस्थित होते.

परमिट रूम, बियर बार व लॉज बंद करण्यासाठी महिलांचा नारायणगावात मोर्चा
पुणे ग्रामीण पोलिसांनी संघटीत गुन्हेगारीविरुद्ध कसली कंबर

कावळे बिल्डर्सने येथील नारायणगाव- कोल्हे मळा रस्त्यालगत हाऊसिंग प्रकल्प उभारला आहे.या ठिकाणी १०९ सादनिकाधारक कुटुंबासह रहात आहेत. कावळे यांनी नियम धाब्यावर बसवून हाऊसिंग सोसायटीच्या ऍमिनिटी जागेत अनधिकृत बांधकाम करून काही महिन्यांपासून हॉटेल गॅलेक्सी इन परमिट रूम,बियर बार व लॉज सुरू केले असल्याचा आरोप सोसायटी धारकांनी केला आहे.सोसायटीच्या जवळच मॅक्स केअर कोविड केंद्र, गणपती मंदिर आहे.नारायणगाव- कोल्हे मळा हा राज्य मार्ग आहे.असे असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोसायटीच्या जागेत गॅलेक्सी इन परमिट रूम,बियर बार सुरू करायला परवानगी दिली आहे.या ठिकाणी मद्यपीचा वावर असतो. सोसायटी व परमिट रूम,बियर बारला येजा करण्यासाठी एकच रस्ता आहे. रात्री उशिरापर्यंत तळीरामांचा येथे धिंगाणा सुरू असतो. दारूच्या रिकाम्या बाटल्या व निरोधची पाकिटे सोसायटीच्या आवारात टाकली जातात. या मुळे सोसायटीत राहणारे विद्यार्थी, महिला,जेष्ठ नागरिक त्रस्त झाले आहेत. या बाबत नारायणगाव पोलीस स्टेशन व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या येथील कार्यालयात या पूर्वी करण्यात आलेल्या तक्रारीची कोणतीही दखल घेतली नाही. असे असेल तर आम्ही न्याय कुणाकडे मागायचा अशी संतप्त प्रतिक्रिया येथील महिलांनी व्यक्त केली.

परमिट रूम, बियर बार व लॉज बंद करण्यासाठी महिलांचा नारायणगावात मोर्चा
पुणे : गाड्या ट्रॅकवरून गेल्यावर क्रीडा संचलनालयाला उपरती!

गॅलेक्सी इन परमिट रूम,बियर बार व लॉज सुरू करताना ग्रामपंचायतिचा ना हरकत दाखला घेण्यात आला नाही.कावळे बिल्डर्सने नियम धाब्यावर बसवून बांधकाम केले आहे.या बाबत ग्रामपंचायतने कावळे यांना नोटीस दिले आहे. लोकवस्तीच्या ठिकाणी परमिट रूम,बियर बार सुरू करण्यास परवाना कसा दिला असा प्रश्न उपस्थित होत आहे.

-योगेश पाटे (सरपंच ग्रामपंचायत नारायणगाव)

परमिट रूम, बियर बार व लॉज बंद करण्यासाठी महिलांचा नारायणगावात मोर्चा
पुणे बंगळूर महामार्गावर ट्रक पलटी; वाहतुक सुरळीत सुरु

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()