‘वर्क फ्रॉम होम’ अन् ‘लर्न फ्रॉम होम’नुसार सदनिकांची निर्मिती

शहरातील नव्या बांधकाम प्रकल्पांत विचार
work frome home
work frome home sakal
Updated on

पुणे : घर (home) हे केवळ राहण्यासाठीच असल्याचा एक काळ होता. परंतु, आता कोरोनामुळे (corona) घरांची संकल्पनाही बदलू लागली आहे. ‘वर्क फ्रॉम होम’ अन् ‘लर्न फ्रॉम होम’ या संकल्पनांनुसार सदनिकांची निर्मिती आता होऊ लागली आहे. त्यामुळे नवी सदनिका घेताना, किचन किंवा डायनिंगच्या जागेबरोबरच घरातून काम करण्यासाठी जागा उपलब्ध करणे, असाही फंडा पुढे येत आहे. त्यासाठी बांधकाम व्यावसायिक आता प्रकल्पांचा आराखडा तयार करताना या संकल्पांचा अंतर्भाव करू लागले आहेत. (Work from Home and Learn from Home According Creation flats)

कोरोनामुळे ऑफिसमध्ये बसून काम करण्याऐवजी ‘वर्क फ्रॉम होम’ला प्राधान्य आता मिळू लागले आहे. तसेच पहिलीपासून ते उच्च शिक्षणापर्यंतच्या विद्यार्थ्यांना आता ऑनलाइन पद्धतीने शिक्षण घ्यावे लागत आहे. त्यामुळे ‘वन बीएचके’ किंवा ‘टू बीचएके’ सदनिकांत राहणाऱ्या कुटुंबाना जागा अपुरी पडू लागली आहे. विशेषतः वन बीएचकेमध्ये राहणाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ अन ‘लर्न फ्रॉम होम’च्या वेळा परस्परांना अडसर ठरू लागल्या आहेत. ऑफिस कामासाठी बेडरूम किंवा हॉलचा वापर सुरू झाला आहे. त्यातूनही नव्या कौटुंबिक समस्या निर्माण होत आहेत.

म्हणूनच नवे घर खरेदी करताना घरात वर्क फ्रॉम होमसाठी जागा असावी, अशी नागरिकांची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे वन बीएचकेचे ग्राहक आता टू बीएचके घरांना पसंती देऊ लागले आहेत. परिणाम आकाराने मोठ्या सदनिकांसाठी चौकशी वाढू लागली आहे, असे बांधकाम व्यावसायिकांचे निरीक्षण आहे.

work frome home
ताई, बघ मेट्रो आली...

क्लब हाउसचे रूपांतर वर्क स्पेसमध्ये ?

काही सोसायट्यांच्या क्लब हाउसमध्ये एरवी सांस्कृतिक कार्यक्रम होतात. परंतु, आता क्लब हाउसची जागा सभासदांना टेबल स्पेसवर भाडेतत्त्वावर देण्याचाही काही सोसायट्या विचार करू लागल्या आहेत. त्यामुळे सदस्यांना वर्क फ्रॉम होमसाठी जागाही उपलब्ध होईल आणि सोसायटीला उत्पन्नाचा नवा स्रोतही निर्माण होईल, असाही त्यामागे विचार आहे.

देशात, परदेशांतही बदल !

अमेरिका, इंग्लंड आदी देशांतीलही बांधकाम व्यावसायिक, इंटेरियर डिझाइनर, वास्तुविशारद नवीन सदनिकेच्या रचनेत मोठे बदल करण्याचे आराखडे तयार करीत आहेत. ऑफिस, ऑनलाइन शिक्षण, व्यायामासाठी जागा आदींचा त्यात समावेश आहे. तसेच घरातून काम करताना सदनिकेचे भिंतीचे रंगही वर्क फ्रॉम होमला पूरक असतील, असा विचार होत आहे. दिल्ली, मुंबई, बंगळुरू, हैदराबाद आदी शहरांतही कोरोनामुळे घरांच्या रचनेत बदल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

work frome home
पुर रेषेचा विचार करुन विकास कामे करा- अजित पवार

नवरा, बायको दोघे वर्क फ्रॉम होम करत असतील आणि त्यांची मुले ऑनलाइन शिक्षण घेत असतील, तर वन बीएचके सदनिकेत घरात खूप अडचणी येतात. त्यामुळे येथून पुढे टू बीएचके घर घेण्याकडे लोकांचा कल वाढेल. त्यांना एक खोली ऑफिसकाम किंवा मुलांच्या ऑनलाइन शिक्षणासाठी वापरता येईल. तसेच घर घेताना, त्यांना इंटरनेट कनेक्टिव्हिटी पुरेशी आहे का, याचाही आता विचार होऊ लागला आहे.

- चेतन पेठे, स्थापत्य अभियंता

work frome home
पुण्यात निर्बंध ‘जैसे थे’ - आरोग्यमंत्री राजेश टोपे

सदनिकेचा आकार, तिचा वापर यांचे आता अधिक बारकाईने नियोजन करावे लागेल. सदनिका खरेदी करताना कोरोनामुळे आता घरातच ऑफिसचीही गरज निर्माण झाली आहे. ऑनलाइन शिक्षण किंवा वर्क फ्रॉम होमसाठी पुरेशी जागा सदनिकेत उपलब्ध असेल, याचा विचार नागरिक प्राधान्याने करतील. त्यानुसार आम्ही आता नियोजन करीत आहोत.

- अभिजित जगताप, संचालक, स्कायी डेव्हलपर्स

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.