Baramati : बारामतीत कारागृहाच्या नूतन इमारतीचे काम सुरु!

शहर पोलिस ठाण्याची इमारत प्रशासकीय भवनासमोरील जागेत नव्याने होत असल्याने या इमारतीनजिकच नवीन कारागृह निर्मितीचे काम सुरु
work new building jail Baramati
work new building jail Baramatisakal
Updated on

बारामती: शहरातील वाढत्या नागरीकरणासोबतच न्यायव्यवस्थेवरील ताणही वाढू लागला आहे. बदलत्या काळानुसार बारामतीत कारागृहाचीही रचना व जागाही बदलली जाणार आहे. बारामती येथील श्रीमंत बाबूजी नाईक वाडयातील शहर पोलिस ठाण्यानजिक गेल्या अनेक वर्षांपासून कारागृह आहे. कच्चे कैदी येथे ठेवले जातात.

बारामतीच्या जुन्या तहसिल कचेरीनजिक हे कारागृह कार्यरत आहे. मात्र आता शहर पोलिस ठाण्याची इमारत प्रशासकीय भवनासमोरील जागेत नव्याने होत असल्याने या इमारतीनजिकच नवीन कारागृह निर्मितीचे काम सुरु झाले आहे.

work new building jail Baramati
Baramati : बारामती फलटण रेल्वे मार्गाची निविदा प्रक्रीया लवकरच सुरु होणार!

बारामतीच्या सध्याच्या कारागृहावर कमालीचा ताण आहे. 23 स्त्री व पुरुष कैद्यांची क्षमता असलेल्या या कारागृहात आज 46 कैदी ठेवण्यात आले आहेत. बारामतीच्या कारागृहात बारामती शहर, बारामती तालुका, माळेगाव येथील कैदी तर येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात ज्यांच्या खटल्यांची नियमित सुनावणी आहे अशा वडगाव निंबाळकर, इंदापूर, दौंड व यवत पोलिस ठाण्यांच्या कैद्यांनाही येथेच ठेवले जाते.

जुनी झालेली इमारत व कारागृहावरील ताण कमी करण्याच्या उददेशाने नवीन पोलिस ठाण्याच्या शेजारीच 15 कोटी रुपये खर्चून नवीन कारागृह निर्मिती सुरु झाली आहे.या मध्ये प्रशासकीय कार्यालयाचा समावेश असून नवीन कारागृहाच्या इमारतीत पुरुष बराकीमध्ये 70 तर महिला बराकीमध्ये 50 असे 120 कैदी मावतील अशी क्षमता करण्यात येत आहे.

work new building jail Baramati
Baramati News : बारामती बँकेच्या अध्यक्षपदी सचिन सातव यांची फेरनिवड

या इमारतीच्या पाया खोदाईचे काम सुरु झाले असून लवकरच प्रत्यक्ष इमारत उभारणीस प्रारंभ होणार आहे. लवकरात लवकर ही इमारत व्हावी या दृष्टीने प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत.श्रीमंत बाबूजी नाईक वाड्याचे नूतनीकरणाचे काम सध्या वेगाने सुरु आहे.

ही ऐतिहासिक वास्तू जतन करण्याचा निर्णय विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी घेतला असून त्या दृष्टीने सध्या काम सुरु आहे. त्या मुळे भविष्यात कारागृहाची इमारत काढावी लागणार असून नवीन कारागृह इमारतीची निर्मिती त्या दृष्टीनेही केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.