वाघोली - एक कोटींच्या २८० लॅपटॉप चोरी प्रकरणी वाघोली पोलिसांनी तीन दिवसात तीन आरोपींना जेरबंद करून २४४ लॅपटॉप हस्तगत केले. गुन्ह्यात वापरलेली वाहनेही पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. या प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून एक फरार आहे..पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ ऑक्टोबर रोजी गोदामातच काम करणाऱ्या दोन कामगारांनी गोदामातून २८० लॅपटॉप चोरले ते टेम्पो मध्ये भरून दिले. तो टेम्पो औरंगाबाद येथे पाठविला. तेथे त्यांच्या एका मित्राने ते सर्व लॅपटॉप एका गोदामात ठेवले.त्यानंतर त्यांनी लॅपटॉप विक्रीसाठी थेट उत्तरप्रदेश मधील प्रयागराज येथे नेले. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपास पथक तयार करून जलद तपास सुरू केला होता. पोलीस कर्मचारी अमोल ढोणे व अजित फरांदे यांनी तांत्रिक विश्लेषणा आधारे माहिती काढून तीन आरोपीना ताब्यात घेवून लॅपटॉप हस्तगत केले. चौथा आरोपी फरार आहे..सुरेश महादेव कुमार,( वय ३५ वर्षे, सध्या रा. उबाळेनगर, वाघोली, मुळ रा. ग्राम सहजपुर, कल्याण ऊर्फ निवाधा, तहसिल सुराव, थाना होलगड, राज्य उत्तरप्रदेश ) शिवाजी जगन्नाथ वसु, ( वय २७ वर्षे, रा. गट नं. ४६, धानेगाव ता. गंगापुर जि. संभाजीनगर ), कुमुद रंजन झा ( वय ३२ वर्षे, रा. प्रियंकानगर, वाघोली ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कस्टडी तिघांना सुनावली आहे.वाघोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक योगेश खटके, सहायक पोलिस निरीक्षक शिरीष भालेराव, पोलीस कर्मचारी अजित फरांदे, स्वप्निल जाधव, अमोल ढोणे, संदीप तिकोणे, विशाल गायकवाड, बाळासाहेब हराळ, सागर कडु, गणेश आव्हाळे, दिपक कोकरे, प्रितम वाघ, गहीनिनाथ बोयणे यांनी ही कामगिरी केली..लॅपटॉप अक्षरशः वाटले२८० लॅपटॉप दोघांनी चोरले होते. त्यातील काही लॅपटॉप त्यांनी औरंगाबाद येथील गोदाम मालक, टेम्पो चालक, टोलनाका आदी ठिकाणी पैशाच्या बदल्यात वाटले. काही लॅपटॉप अगदी कमी किमतीत विकले. ३६ लॅपटॉप त्यांनी वाटले व विकले. लिनोव्हा कंपनीचे लॅपटॉप होते.२४४ लॅपटॉप, दोन वाहने व तीन मोबाईल असा सुमारे एक कोटी रुपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे. सहज पैसे कमविणे असा त्यांचा उद्देश होता..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.