Pune : वाहतूक कोंडीवरून कामगारांना मारहाण;नवी सांगवीतील क्रांती चौकामधील प्रकार

तुमच्या बसमुळेच वाहतूक कोंडी झाल्याचे म्हणत दोघांनी खासगी कंपनीच्या बसचालकाला शिवीगाळ केली. दरम्यान, रस्त्यावर झालेली वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कंपनीच्या बसमधील कर्मचारी बसमधून खाली उतरले असता दोघांनी मिळून खासगी कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांना मारहाण केली. हा प्रकार नवी सांगवीतील क्रांती चौक येथे घडला.
Pune
Pune sakal
Updated on

पिंपरी : तुमच्या बसमुळेच वाहतूक कोंडी झाल्याचे म्हणत दोघांनी खासगी कंपनीच्या बसचालकाला शिवीगाळ केली. दरम्यान, रस्त्यावर झालेली वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कंपनीच्या बसमधील कर्मचारी बसमधून खाली उतरले असता दोघांनी मिळून खासगी कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांना मारहाण केली. हा प्रकार नवी सांगवीतील क्रांती चौक येथे घडला.

या प्रकरणी नितीन बबन गायकवाड (रा, मुक्तीनंद पार्क, नवी सांगवी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दुचाकीवरील दोन अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हे त्यांच्या कंपनीच्या बसमधून चिखली येथील कंपनीत कामासाठी जात होते. दरम्यान, नवी सांगवीतील क्रांती चौक येथे उजवीकडे बस वळत असताना वाहतूक कोंडी झाली.

दरम्यान, दुचाकीवरील दोन आरोपींपैकी एकाने बसचालकाला ‘तुमच्या बसमुळे वाहतूक कोंडी झाली,’ असे म्हणत शिवीगाळ केली. त्यावेळी फिर्यादी व बसमधील इतर कर्मचारी वाहतूककोंडी सोडविण्यासाठी खाली उतरले. दरम्यान, आरोपीने रस्त्यावरील दगड उचलून बसमध्ये बसलेले कर्मचारी सचिन घाटगे यांच्या डोक्यात मारला.

कात्री फिर्यादी यांच्या कपाळावर मारली. फिर्यादी यांनी विरोध केला असता ती कात्री फिर्यादी यांच्या छातीला, हाताला लागल्याने त्यांना दुखापत झाली. त्यानंतर आरोपी दुचाकीवरून पसार झाले. सांगवी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.