पुणे - ‘घरात (Home) थांबलं की, सगळ्यांनाच काही ना काही तरी हवं असतं. प्रत्येकाची फर्माईश वेगवेगळी असते. स्वतःसाठी वेळच देता येत नाही. घरातील कामांत (Work) दिवस कसा जातो, हे समजत नाही. सोशलायझेशन (socialization) होत नसल्यामुळे आता वर्क फ्रॉम होम (Work From Home) नकोसे झालंय,’ अशी भावना नोकरदार महिलांकडून (Women) होऊ लागली आहे. कधी एकदाचा लॉकडॉउन (Lockdown) संपतोय, असेही त्यांना वाटू लागलं आहेत.
कोरोनामुळे दुसऱ्यांदा लॉकडॉउन लागू झाला आहे. माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील कंपन्या असो अथवा काही उद्योग-व्यवसाय, या सगळ्यांनी वर्क फ्रॉम होमवरच भर द्यावा, अशा सूचना राज्य सरकारने केल्या आहेत. त्यामुळे बहुतेक खासगी कंपन्यांत वर्क फ्रॉम होम सुरू आहे. सुरवातीला हवे हवेसे वाटणारं वर्क फ्रॉम होम आता नोकरदार महिलांना नकोसे वाटू लागलं असल्याचे त्यांच्याशी बोलताना जाणवलं. सगळेच घरात असल्यामुळे वाद-विवाद वाढू लागले आहेत, असेही या महिलांना वाटू लागले आहे.
एका एमबीए कॉलेजमध्ये शिकविणाऱ्या प्राध्यपिका म्हणाल्या, ‘माझ्या घरात पती, दोन मुलं आणि सासू-सासरे आहेत. घरात त्यांच्यासमोर दिसले की, प्रत्येकाची फर्माईश वेगळी असते. सकाळचा नास्टा, दुपारचं जेवण, सायंकाळचे स्नॅक्स की लगेच रात्रीचं जेवण, यामुळे दिवस अक्षरशः स्वयंपाक घरातच जातो. धुणी-भांडी, स्वयंपाकाला बाई येत असली तरी, घरात प्रत्येकाकडं लक्ष द्यावच लागतंय. त्यामुळे मी आता दिवसाआड कॉलजला जायला सुरवात केली आहे. कॉलेजमध्ये सहकाऱ्यांशी चर्चा होते, जरा वाचन करता येत. स्वतःला वेळ तरी मिळतो.’ मी समोर दिसले की, घरात सगळ्यांनाच काही ना काही तरी हवं असतं. त्यांच्या पुढे नाचून-नाचून अगदी दमायला होतं, असेही त्यांनी सांगितले.
एका खासगी संस्थेत प्रशासकीय काम करणारी नोकदार महिला म्हणाली, ‘घरात चार वेळा पती, मुलगा आणि सासू-सासऱ्यांकडे लक्ष द्यावं लागते. एरवी मी घरात नसायची तेव्हा प्रत्येकजण आपआपली कामं करीत असे. पण मी घरात असले की जेवण झाल्यावर स्वतःचं ताटही कोणी उचलत नाही. मला एमबीएची परीक्षा द्यायची आहे. त्याचा अभ्यास करायलाही घरात वेळ मिळत नाही. त्यामुळे गेल्या आठवड्यापासून मी आता ऑफिसला जाण्यास सुरवात केली आहे. रोज चार तास ऑफिसला थांबते. काम कमी असल्यामुळे अभ्यासाला थोडा वेळ तरी मिळतो.’’ वर्क फ्रॉम होम सुरवातीला बरं वाटत होतं. पण आता नकोसं झालयं, स्वतःची स्पेसच हरवली आहे, असं वाटतंतय, असेही त्यांनी सांगितले.
दीड वर्षांपूर्वी लग्न झालेली व एका उद्योग समूहात काम करणारी युवती म्हणाली, ‘माझ्याकडे अकाऊंटची कामे आहेत. ती घरातूनही करता येतात, म्हणून मी वर्क फ्रॉम होम सुरू केलं. पण, आता कंटाळा आला आहे. घरातील कामं तर आहेचत, पण पती, सासू-सासरे यांच्याकडे अधिक लक्ष द्यावं लागतंय.’
काही निरीक्षणे...
जेष्ठांशी संवादात अधिक वेळ जातो
जी कामे एरवी अर्ध्या-एक तासात होत असत, त्याला अधिक वेळ लागतो आहे
स्वतःला वेळच देता येत नाही, त्यामुळे चिडचिड वाढली आहे
काम करताना सासू-सासऱ्यांचे
लक्ष असतं. त्यामुळे माझ्यावर कोणी तरी नजर ठेवत आहे, असे वाटतंय
ऑफिस बरं, असंच आता वाटू लागलं आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.