world environment day: चला वाचवूया दुर्मीळ वृक्ष!

शहर परिसरामध्ये वीस प्रजातींचे एकच झाड शिल्लक
 वृक्ष
वृक्ष sakal
Updated on

पुणे : शहराला पाचशेहून अधिक वृक्ष प्रजातींची समृद्ध विविधता लाभली आहे. यात दोनशे जाती दुर्मीळ आहेत. त्यापैकी वीस प्रजातींचे एकमेव वृक्ष गर्दीच्या भागत रस्त्याकडेला उभे आहेत. वृक्षवल्ली आम्हा सोयरे फक्त म्हणण्यापुरते नसावे, तर त्याप्रमाणे वागणेदेखील असणे काळाची गरज झाली आहे. रविवारी (ता. ५) असलेल्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त या दुर्मीळ वृक्षांचे संवर्धन होणे गरजेचे असल्याचे मत पर्यावरण अभ्यासक श्रीकांत इंगळहळ्ळीकर यांनी व्यक्त केले. याबाबत महापालिकेनेही उपाययोजना करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

शहरातील वृक्षसंपदा जपण्याची जबाबदारी सर्वांची आहे. यासाठी दुर्मिळ प्रजातीच्या वृक्षांवर हरित माहिती फलक लावून त्यांच्या खास दर्जाची जाणीव नागरिकांना करून देणे आवश्यक आहे. रस्ता रुंदीत अशा वृक्षांचे पुनर्रोपण विशेष काळजी घेऊन करता येईल. लक्ष न दिल्यामुळे गेल्या दहा वर्षांत अनेक दुर्मिळ वृक्ष नष्ट झाले आहेत. त्यामुळे निसर्गाचा हा ठेवा जपण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. दुर्मिळ वृक्षांना धोका असल्यास त्याबाबत नागरिकांनी त्याबाबत पुणे वृक्ष प्राधिकरणास माहिती दिल्याचे त्यांचे संवर्धन करणे शक्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या जातींचे एकमेव वृक्ष

नाव ठिकाण

उंडी ताथवडे उद्यानासमोर, कर्वेनगर

हिमालय रिठा सिद्धार्थ पॅलेससमोर, कोथरूड

कमंडलू गिरिजाशंकर विहार, कर्वेनगर

श्रीलंकेचा अंबाडा वारजे

चिंचवा ह्यूम पाइप फॅक्टरी, सिंहगड रस्ता

टोकफ अभिरुची, सिंहगड रस्ता

दिल्ली साव लकाकी, माॅडेल काॅलनी

हेदु गणेशखिंड रस्ता

शेविंग ब्रश सहकारनगर

नेवर येरवडा, नगर रस्ता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.