World Wind Day 2023 : पुणेकरांच्या आरोग्याला वाढतोय धोका, वायू गुणवत्तेचा उतरता आलेख
Pune Pollution Harmful For Health: भरपूर झाडींचं, थंड हवेचं आणि सायकलींच शहर म्हणून ओळखलं जाणारं पुणे आता एवढ्या झपाट्यात वाढत आहे की, इथल्या हवामानाची, वायूची गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. वाढत्या प्रदुषणामुळे हवेतल्या धुलीकणांचे प्रमाण वाढले आहे. ज्यामुळे चिंता वाढली आहे. बवामानातला बदल, प्रदुषित वातावरण यामुळे पुण्यातल्या हवेच्या गुणवत्तेत घट दिसून आली आहे. त्यामुळे इथे धुके नाही तर धुरके दिसून येतात. ज्याचा परीणाम पुणेकरांच्या आरोग्यावर होऊ शकतो.
एकीकडे राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत पुण्याचे वायू प्रदूषण कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याच वेळी, हिवाळ्यात वायू प्रदूषण हा सलग दोन-तीन वर्षांपासून चिंतेचा विषय राहिला आहे. भारतीय उष्णकटिबंधीय हवामान विभागाच्या (IITM) SAFAR योजनेंतर्गत शहरातील विविध भागात दहा केंद्रांद्वारे हवेतील सूक्ष्म कण (पार्टिक्युलेट मॅटर 10), सूक्ष्म कण (PM 2.5) यासह विविध प्रदूषण निर्देशांक दररोज नोंदवले जातात. या आधारे हवेची गुणवत्ता ठरवली जाते. गेल्या आठवड्यापासून तापमानात चढ-उतार होत आहेत. वारे वाहत आहेत. त्यामुळे उंचावरील सूक्ष्म धूळ हवेत गायब झाल्याने दर्जा घसरला आहे.
नागरिकांच्या आरोग्याला धोका
अति सूक्ष्म धुलीकण श्वासातून थेट फूफ्फूसात जातात. त्यामुळे हवेतले याचे प्रमाण वाढणे हो आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही. मागील काही वर्षांत पुण्याच्या हवेत अती सूक्ष्म धुलीकणांचे प्रमाण वाढले आहे. हवेच्या ढासळत्या गुणवत्तेसाठी दर वेळी हवामानातल्या बदलाला दोष देणं योग्य नसल्याचा आक्षेप राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने हवेचा दर्जा सुधारण्यासाठी नेमलेल्या टास्क फोर्सवर घेतला आहे.
पर्यावरणाचे प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. वातावरणात सूक्ष्म, अत्यंत सूक्ष्म धुळीचे प्रमाण कमी असते, त्यामुळे तापमान कितीही कमी झाले तरी हवेची गुणवत्ता बिघडणार नाही. त्यामुळे प्रदूषणाच्या स्रोतांवर काम करण्याची मागणी टास्क फोर्सने प्रशासनाकडे केली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.