मंचर - 'आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघातील महिलां व युवतींनी अन्नप्रक्रिया उद्योग उभे करावेत. त्यासाठी प्रकल्प अहवाल तयार करण्यापासून बँकांचे अर्थसहाय्य, शासनाच्या विविध योजना, प्रशिक्षण, पॅकिंग, मार्केटिंग आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. याबाबत अद्यावत प्रशिक्षण व उत्पादित मालाचे ब्रॅण्डिंग होण्यासाठी अनुसया महिला उन्नती केंद्राने व पूर्वा वळसे पाटील यांनी पुढाकार घ्यावा' असे आवाहन सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.
मंचर (ता.आंबेगाव) येथे शिवगिरी मंगल कार्यालयात शुक्रवारी (ता.८) जागतिक महिला दिनानिमित्त अनुसया केंद्राच्या वतीने आयोजित केलेल्या महिला मेळावा व सांस्कृतिक कार्यक्रमात वळसे पाटील बोलत होते. त्यावेळी अनुसया महिला उन्नती केंद्राच्या अध्यक्षा किरण वळसे पाटील, पूर्वा वळसे पाटील, सुषमा शिंदे, सविता बगाटे, उषा कानडे, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, संचालक बाबासाहेब खालकर यांच्यासह अनेक गावच्या महिला सरपंच व बचत गटाचे अध्यक्ष उपस्थित होते.
वळसे पाटील म्हणाले, 'यापुढे विधिमंडळ व लोकसभेत महिला प्रतिनिधींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यांना राज्य व देशाच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. प्रत्येक कुटुंबाच्या प्रगतीत महिलांचे योगदान मोठे आहे. महिलांनी विविध कौशल्य विकसित करणारी प्रशिक्षण घ्यावीत. उद्योग व्यवसाय उभे करावेत. विश्वकर्मा योजनेचाही गरजू महिलांना लाभ मिळण्यासाठी अनुसया केंद्रामार्फत प्रत्येक गावातील पात्र लाभार्थींना मार्गदर्शन केल जाईल.'
इलेक्ट्रिक फोर व्हीलर सर्विस टेक्निशियन मोफत प्रशिक्षणाचे माहिती ज्ञानशक्ती विकास वाहिनी संस्थेच्या वतीने देण्यात आली. दुसऱ्या बॅच साठी विनामूल्य प्रवेश असल्यामुळे इयत्ता दहावी उत्तीर्ण मुला-मुलींनी मंचर येथे रामा ऑटो प्रशिक्षण केंद्रात प्रवेश घ्यावा असे आवाहन करण्यात आले. “बाईपण भारी देवा” या गीताला उपस्थित महिलांनी भरभरून दाद दिली. पुष्पलता जाधव, सरस्वती शिंदे यांची भाषणे झाली. अनुसया महिला केंद्र व अनुसया पतसंस्थेच्या वतीने व्यवस्था पहिली.
'लग्नानंतर सासरच्या मंडळीकडून प्रत्येक महिलेला सन्मान मिळाला पाहिजे. प्रेमाने तिला विश्वासात घेऊन प्रत्येक निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेणे आवश्यक आहे. त्यानंतरच खऱ्या अर्थाने स्री-पुरुष समानता निर्माण झाली. असे म्हणणे उचित ठरेल.'
- किरण वळसे पाटील, अनुसया महिला उन्नती केंद्र मंचर
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.