Pune News : पार्थ पवार यांना वाय प्लस सुरक्षा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना नुकतीच वाय प्लस सुरक्षा पुरवण्यात आली आहे. राज्य सरकारने याबाबतचा निर्णय घेतला आहे.
Parth pawar
Parth pawarsakal
Updated on

पुणे - उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना नुकतीच वाय प्लस सुरक्षा पुरवण्यात आली आहे. राज्य सरकारने याबाबतचा निर्णय घेतला आहे. मात्र निवडणुकीच्या काळात अनेकांना पुरविण्यात आलेली सुरक्षा पुणे पोलिस आयुक्तांनी काढून घेतली आहे. असे असताना पार्थ पवार यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आल्याने उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.

सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी पार्थ पवार बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचारसभा घेत आहेत. कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन ते मतदारसंघातील नागरिकांसोबत ते संवाद साधत आहेत.

याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पार्थ पवार यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. पार्थ अजित पवार यांनी २०१९ मध्ये मावळमधून लोकसभेची निवडणूक लढवली होती. तेव्हापासून ते राजकारणात सक्रिय झाल्याचे दिसते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.