धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या करुणा शर्माविरुद्ध येरवडा पोलिसात गुन्हा दाखल

घटस्फोटासाठी महिलेस जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी महिलेच्या पतीसह शर्माविरुद्ध ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल
Yerawada police has registered case against Karuna Sharma for making allegations against Dhananjay Munde puner
Yerawada police has registered case against Karuna Sharma for making allegations against Dhananjay Munde puneresakal
Updated on

पुणे : महिलेच्या पतीला घटस्फोट देण्यासाठी पतीसमवेत संगनमत करुन संबंधित महिलेस जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पतीसह करुणा शर्मा हिच्याविरुद्ध येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर करुणा शर्मा यांनी वैयक्तीक आरोप केल्यानंतर त्या प्रकाशात आल्या होत्या. अजयकुमार विष्णू देडे (वय 32, रा.शिवाजीनगर, उस्मानाबाद), करुणा शर्मा (वय 43, रा.सांताक्रुज, मुंबई) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध जीवे मारण्याची धमकी देणे, अनुसूचित जाती जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार (ऍट्रोसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी स्वप्नांजली अजयकुमार देडे (वय 23, रा.लक्ष्मीनगर, येरवडा) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हा प्रकार नोव्हेंबर 2021 ते 30 मे या कालावधीत घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व अजयकुमार देडे यांची काही वर्षांपुर्वी लग्न झाले आहे. दरम्यान, देडे यास पत्नीपासून घटस्फोट पाहीजे होता. त्यानंतर फिर्यादीचा पती व करुणा शर्मा यांनी संगनमत करुन फिर्यादीस त्रास देण्यास सुरुवात केली. दरम्यान, करुणा शर्मा हिने फिर्यादीस हॉकीस्टीकचा धाक दाखवून जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच दोघांनीही फिर्यादीने घटस्फोट द्यावा, यासाठी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. पतीने फिर्यादीसमवेत अनैसर्गिक शारिरीक संबंध ठेवून त्यांना मानसिक व शारिरीक त्रास दिला, अशी माहिती फिर्यादीने आपल्या फिर्यादीमध्ये नमूतद केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.