YIN Cabinet Tour : यिन मंत्रिमंडळाच्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरवात

यिन मंत्रिमंडळाच्या महाराष्ट्र दौऱ्याला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करत सुरवात झाली.
YIN Cabinet Maharashtra
YIN Cabinet MaharashtraSakal
Updated on
Summary

यिन मंत्रिमंडळाच्या महाराष्ट्र दौऱ्याला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करत सुरवात झाली.

पुणे - यिन मंत्रिमंडळाच्या महाराष्ट्र दौऱ्याला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करत सुरवात झाली. या दौऱ्यामध्ये ‘यिन’चे उपमुख्यमंत्री अल्लाउद्दीन बेग, महसूलमंत्री रोहित आगळे, वित्तमंत्री अजरोद्दीन शेख, सामाजिक न्यायमंत्री वैष्णवी खताळ, केंद्रीय कॅबिनेट सदस्य समेद कलभावी यांनी पुणे शहरात विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटी घेतल्या.

अशोक महाविद्यालयात गेल्यानंतर संस्थेचे कार्यकारी संचालक प्रथमेश अबनावे यांची झाली. ते म्हणाले, ‘‘महाविद्यालयीन वयात शिक्षणासोबत सर्व कला कशा जोपासाव्यात, महाविद्यालयातून नेतृत्व उदयास येते त्यासाठी आपली आवड ओळखता आली पाहिजे.’’ त्यानंतर सर परशुरामभाऊ महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी आणि याच महाविद्यालयाचे यिन अध्यक्ष स्वप्नील पालखे, उपाध्यक्ष करिष्मा राठोड, पुण्याचे यिन महापौर सुमीत पतंगे, पिंपरी चिंचवडचे यिन महापौर ऋषिकेश ससाणे, ‘एआयएसएसएमएस’चे अध्यक्ष आशुतोष साठे यांनी सर्व मंत्रिमंडळाचे जल्लोषात स्वागत केले. उपप्राचार्य प्रा. धनंजय दिवटे, उपप्राचार्या डॉ. विद्या चव्हाण यांनी युवतींना मानसिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी नवनवीन कार्यक्रम राबविले गेले पाहिजेत, असे मत व्यक्त केले.

पुणे स्मार्ट सिटीचे सीईओ डॉ. संजय कोलते यांच्या भेटी दरम्यान ते म्हणाले, ‘‘स्मार्ट सिटी मिशन हे देशातील शहर स्मार्ट करण्यासाठी २०१५ ला सुरू केले आहे. आधुनिकीकरण करण्यासाठी १०० शहरे निवडलेली आहेत. पाणी, आरोग्य, रस्ते मॉडर्न करणे, त्याला सायकलिंगसाठी स्वतंत्र रस्ते करणे, ई-बसेस, पाण्याला मीटर बसवणे, शहरात वायफाय सुविधा अशा प्रकारे काम आमच्या विभागाच्या वतीने केली जातात.’’ मनपाचे सांस्कृतिक विभागाचे उपायुक्त संतोष वारुळे यांनी त्यांच्याकडे असलेल्या क्रीडा, सांस्कृतिक आणि भांडार या विभागाची माहिती दिली.

शहरातील विविध पक्षाचे युवकचे अध्यक्ष यांना ‘सकाळ कार्यालया’त एकत्रित बोलावून रोजगारावर पक्षाचे धोरण, मतदान जनजागृती मोहीम, संघटन उभे कसे करावे, वारसाने किंवा सामान्य कुटुंबातील युवकांना संधी हवी असेल तर काय करावे अशा अन्य प्रश्नांवर यिन मंत्री मंडळासोबत चर्चा झाली.

यामध्ये पुणे शहराचे युवा सेनेचे अध्यक्ष राम थरकुडे, राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष किशोर कांबळे, राष्ट्रीय युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल शिरसाट, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमोल शिंदे हे सहभागी होते.

‘यिन’च्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांकडे आपण भविष्यातील यशस्वी राजकारणी म्हणून पाहायला काही हरकत नाही. येणाऱ्या भारताचे भविष्य हे याच तरुणाईच्या हातात आहे. ‘सकाळ यिन’च्या वतीने राबविला जाणारा नेतृत्व विकास कार्यक्रम अतिशय स्तुत्य असून ‘यिन’च्या पुढील सर्व उपक्रमांसाठी माझ्या मनापासून शुभेच्छा.

- प्रथमेश आबनावे, कार्यकारी संचालक, महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.