वजन ठेवलं की लगेच मिळतो कुणबी दाखला ?

money.jpg
money.jpg
Updated on

राजगुरुनगर (पुणे) : कुणबी दाखला काढण्यासाठी खेड तालुक्‍यात लाभार्थींना अवांतर पैसे मोजावे लागत असून याचा प्रामुख्याने विद्यार्थ्यांना भुर्दंड बसत आहे. 
सरकारी फी अवघी 56 रुपये असताना कुणबी जातीचा दाखला काढण्यासाठी लाभार्थींकडून प्रकरण दाखल करून घेतानाच सरसकट कमीतकमी एक हजार रुपये घेतले जात आहेत. त्यानंतर ज्या ज्या सरकारी टेबलावर हे प्रकरण जाते, त्या बहुतांश ठिकाणी लाभार्थ्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भुर्दंड पडतो. अन्यथा प्रकरण लटकवून ठेवले जाते, अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते अॅड. अनिल ढवळे यांनी केली आहे. दाखला देताना पैशानुसार पक्षपात होतो. दोन भावांच्या मुलांची सारखीच वंशावळ असताना एकाला लवकर दाखला मिळतो, तर तीच कागदपत्रे असलेल्या दुसऱ्याचा लटकतो, असे ते म्हणाले. 

राजकीय कारणांसाठी दाखला पाहिजे असेल, तर चार आकडी रकमांमध्ये जातो. अशी प्रकरणे करून देणारे एजंट असून पूर्वजांची माहिती काढण्यापासून, मोडी भाषेतील मजकूर प्रमाणित करण्यापासून ते कुणबींची वंशावळ जुळवून दाखला हातात देण्यापर्यंत सर्व काम ते करून देतात. खेड तालुक्‍यात असे दाखले मोठ्या प्रमाणात दिले जात असल्याने या मागच्या प्रकरणांची चौकशी व्हावी, अशी मागणी आरपीआयने केली आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या दाखल्यावर पुढच्या अॅडमिशन, नोकरी यांसारख्या गोष्टी अवलंबून असल्याने लोक नाइलाजाने भुर्दंड सहन करतात. साधारणपणे एक दाखला चार ते पाच हजारांना पडतो, अशा तक्रारी असून हे प्रकार त्वरित थांबले नाहीत, तर तीव्र आंदोलन केले जाईल. 
- संतोषनाना डोळस, खेड तालुकाध्यक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) 
 

आम्ही प्रांत कार्यालयातून कुठलीही अडवणूक न करता, ताबडतोब जातीचे दाखले देत आहोत. गेल्या दीड वर्षात माझ्या सहीने 932 कुणबी दाखले दिले आहेत. याबाबत कोणत्याही स्तरावर गैरव्यवहार होत असल्याची पुराव्यानिशी तक्रार केल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करू. तसेच अन्य योग्य कारवाई करू. 
- संजय तेली, उपविभागीय अधिकारी, खेड  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.