घोरपडी - वानवडीमध्ये आज दुपारी चारचाकी गाडीत अनुप रॉय (वय ३८,रा. साहिल प्राईड सोसायटी, कामठे पाटील नगर, येवलेवाडी) या तरुण डॉक्टरचे हृदयविकाराने निधन झाले.
वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांनी दिलेल्या माहितीनुसार आज दुपारी वानवडीतील परमार पार्क सोसायटी समोर चारचाकी गाडी चालू असताना त्यामधील व्यक्ती बेशुद्धावस्थेत पडली.