Pune Crime : व्यवसायात भागीदारीसाठी तगादा लावल्याने तरुणाने संपविले जीवन

व्याजाने दिलेल्या पैशांत हॉटेल व्यवसायात भागीदारी देण्याचा तगादा लावल्याने तरुणाने आत्महत्या केल्याची घटना महात्मा फुले पेठ परिसरात घडली.
Crime
Crimesakal
Updated on

पुणे - व्याजाने दिलेल्या पैशांत हॉटेल व्यवसायात भागीदारी देण्याचा तगादा लावल्याने तरुणाने आत्महत्या केल्याची घटना महात्मा फुले पेठ परिसरात घडली. या प्रकरणी खडक पोलिस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

शिवराज विजयकुमार वडलकोंडा (रा. महात्मा फुले पेठ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी स्नेहल वडलकोंडा यांनी खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून रोहित सुभाष भोंडे (वय ५४, रा. महात्मा फुले पेठ) या संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवराजने हॉटेल सुरू करण्यासाठी भोंडेकडून पाच लाख रुपये व्याजाने घेतले होते.

त्यानंतर भोंडेने हॉटेलमध्ये ५० टक्के भागीदारी देण्यासाठी शिवराजकडे तगादा लावला होता. त्यावर विचार करण्यासाठी शिवराजने काही दिवसांची मुदत मागितली होती. परंतु भोंडेने शिवराजच्या परस्पर हॉटेलमधील साहित्याची विक्री केली. त्यातून आलेली रक्कम शिवराजला न देता त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केले, असे फिर्यादीत म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.