हडपसरवरून गाठले धायरी; तब्बल तीन तास थांबल्यानंतर लसीकरण

महापालिकेने शहरात ११० केंद्रे सुरू केली; पण अवघ्या पाच केंद्रांवरच १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरण सुरू आहे.
Vaccination
VaccinationSakal
Updated on

पुणे - महापालिकेने (Pune Municipal Corporation) शहरात ११० केंद्रे सुरू केली; पण अवघ्या पाच केंद्रांवरच १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरण (Vaccination) सुरू आहे. त्यातही शहरातील लाखो तरुण (Youth) नोंदणीसाठी (Registration) इच्छुक असताना मिळेल ते केंद्र बुक करून लसीकरणासाठी जात आहेत. भले ते केंद्र घरापासून २० किलोमीटर दूर असले तरी चालेल. अशा स्थितीत बुधवारी तरुणांनी सुट्टी (Holiday) टाकून लसीकरणास प्राधान्य दिले. (Young people prefer to take leave and get vaccinated)

विवेक चव्हाण हे हडपसर येथे रहायला आहेत. सकाळी सव्वासातच्या सुमारास धायरी येथील लायगुडे रुग्णालयात लस उपलब्ध असल्याने त्यांनी स्वतःसह पत्नी व भावासाठी सकाळी ९ ते ११ चा स्लॉट बुक केला. चव्हाण म्हणाले, ‘लसीकरण केंद्र घरापासून दूर आहे, पण जेथे उपलब्ध आहे, तेथे जाऊन लस घेणे गरजेचे आहे.’ अशाच प्रकारे धायरी येथे विमाननगर, वाकड, रहाटणीतून तरुण लसीकरणासाठी आले होते.

Vaccination
पुण्यातील रुग्णांना दिलासा; जिल्ह्याला मिळणार १२ हजारांहून अधिक रेमडिसिव्हीर

भरत ठक्कर हे त्यांच्या पत्नीला लस देण्यासाठी राजीव गांधी रुग्णालयात गेले होते. तेथे टोकन देऊन नागरिकांना रांगेत थांबविले होते. आॅनलाइन बुकिंग करूनही पुन्हा लसीकरण केंद्रांवर येऊन टोकन घ्यायला लावले. मग आॅनलाइन नोंदणीची गरज काय, असा प्रश्‍न ठक्कर यांनी केला. तसेच, १२ ते १ या वेळेत लसीकरण असताना सव्वादोनच्या सुमारास माझ्या पत्नीचा नंबर लागला. गर्दी असताना तेथे सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नव्हते, त्यासाठी कर्मचारीही नव्हते, असे ठक्कर यांनी सांगितले.

कोथरूडच्या सुतार दवाखान्यात लसीकरणाची सुविधा होती, योग्य पद्धतीने लसीकरण झाले. याठिकाणी ज्येष्ठ नागरिकदेखील होते, त्यांना प्राधान्य दिले जात होते. लस मिळण्यासाठी मला दोन तास रांगेमध्ये थांबावे लागले.

- विनायक अरगडे, कोथरूड

चार दिवसांपासून लसीकरणासाठी प्रयत्न करत होतो. सकाळी उठून चेक केले असताना लायगुडे रुग्णालयात नंबर लागला. त्यामुळे वाकडवरून थेट धायरी येथे लस घेण्यासाठी आलो आहोत. इथे मोठ्या प्रमाणात गर्दी आहे, लसीकरण ठरलेल्या वेळेत सुरू होणे गरजेचे आहे.

- विपिन कुमार, रहाटणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()