Rajgad : राजगड तालुक्यातील युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनकडून बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंत्यावर फेकली शाई ; दहा ते बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

राजगड तालुक्यातील दुर्गम भागातील भट्टी खिंड ते केळद रस्त्याच्या दुरावस्थेबाबत आमदार संग्राम थोपटे यांनी समन्वय समितीच्या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दुरुस्ती बाबत सूचना देऊनही कोणत्याही प्रकारची दुरुस्ती झाली नाही यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत असल्याचा आरोप करत तालुका कॉंग्रेसच्या संतप्त कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंत्यावर शाई फेकली व तीव्र नाराजी व्यक्त केली.
Rajgad
Rajgad sakal
Updated on

वेल्हे : राजगड तालुक्यातील दुर्गम भागातील भट्टी खिंड ते केळद रस्त्याच्या दुरावस्थेबाबत आमदार संग्राम थोपटे यांनी समन्वय समितीच्या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दुरुस्ती बाबत सूचना देऊनही कोणत्याही प्रकारची दुरुस्ती झाली नाही यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत असल्याचा आरोप करत तालुका कॉंग्रेसच्या संतप्त कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंत्यावर शाई फेकली व तीव्र नाराजी व्यक्त केली.

तर अभियंत्याने कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी शिवीगाळ करून मारण्याची धमकी देऊन शासकीय काम करण्यापासून परावृत्त केल्या प्रकरणी वेल्हे पोलिसांत फिर्याद दिली असल्याची माहिती वेल्ह्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक नितीन खामगळ यांनी दिली.

साईप्रसाद दिनेशराव मनगीलवार (वय.३४) कनिष्ठ अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग वेल्हे ,सध्या राहणार आंबेगाव बुद्रुक पुणे ,मूळ गाव देगलूर जिल्हा नांदेड असे अभियंत्याचे नाव असून ही घटना सोमवार(ता.०५) रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास सार्वजनिक बांधकाम विभागाचे वेल्हे कार्यालय याठिकाणी घडली आहे.

याबाबत माहिती अशी शुक्रवार (ता.26 )जुलै रोजी पंचायत समितीच्या सभागृहामध्ये आमदार संग्राम थोपटे यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये तालुक्यातील नागरिकांनी दुर्गम भागातील केळद, पासली, वरोती इतर अठरा गाव मावळ परिसरातील नागरिकांनी रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केला यावेळी संग्राम थोपटे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना रस्ता दुरुस्ती करण्याच्या तात्काळ सूचना देण्यात आल्या होत्या मात्र दहा दिवस उलटूनही याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या रस्त्याची दुरुस्ती न झाल्याने आज संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी कनिष्ठ अभियंता साई प्रसाद मनगिलवार यांच्यावर शाही फेकून तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.

घटना घडल्यानंतर अभियंत्याने वेल्हे पोलीस स्टेशन मध्ये जाऊन काँग्रेस कार्यकर्त्यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली या तक्रारीमध्ये डोक्यावर व चेहऱ्यावर तसेच अंगावर पूर्ण शाई टाकली असून कार्यकर्त्यांनी मोठ्या मोठ्याने शिवीगाळ करून मारण्याची धमकी देऊन शासकीय काम करण्यापासून परावृत्त केल्या प्रकरणी फिर्याद दिली आहे याप्रकरणी वेल्हे पोलिसांनी महेश जाधव पूर्ण नाव माहीत नाही राहणार कोलंबी (ता. वेल्हे, राजगड) व काँग्रेस तालुका युवक अध्यक्ष शिवराज शेंडकर व इतर दहा ते बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असल्याची माहिती वेल्ह्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खामगळ यांनी दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.