युवक दिन विशेष : कौशल्यासह हवा काम करण्याचा दृढ निश्‍चय

Youth
Youth
Updated on

पुणे - एकदा पदवी मिळवली आणि नोकरी लागली की शिक्षण संपले, असे सध्याच्या काळात होत नाही. आता पदवी मिळाली, तरी दर एक-दोन वर्षांनी आपल्यात बदलते कौशल्य आत्मसात केले पाहिजे. बदलत्या काळानुसार ज्ञान आत्मसात करण्यासाठी ऑनलाइन शिक्षण, प्रत्यक्ष कामातून अनुभव याचा दृढ निश्‍चय करणे आवश्‍यक आहे. येत्या काळात युवकांना पर्यावरण आणि डिजिटल क्षेत्रात झेप घेण्याची संधी असल्याचा कानमंत्र तज्ज्ञांनी दिला.

स्वामी विवेकानंद यांच्या जयंती दिन दरवर्षी युवक दिन म्हणून साजरा केला जातो. ‘कोरोना’मुळे जगाची परिभाषा बदललेली असताना, त्यात शिक्षण, नोकरी यांच्यावरही परिणाम झाला आहे. अशा काळात तरुणांनी पुढे जाताना काय केले पाहिजे, यावर ‘सकाळ’ने तज्ज्ञांशी संवाद साधला. मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे महासंचालक प्रशांत गिरबने म्हणाले, ‘‘अलीकडेच ‘मॅकेंझी’चा अहवाल प्रकाशित झाला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कॉमर्सचे महासंचालक प्रशांत गिरबने म्हणाले, ‘‘अलीकडेच ‘मॅकेंझी’चा अहवाल प्रकाशित झाला. त्यामध्ये २०३०पर्यंत भारतात ९ कोटी रोजगाराची निर्मिती झाली पाहिजे, असे नमूद केले आहे. आतापर्यंत रोजगारासाठी आपण केवळ ‘पदवी’च पहात होतो. पण आता पदवीसोबत कौशल्य आत्मसात केले आहेत, का यास महत्त्व दिले जाईल. जग गतीने बदलत असताना नोकऱ्या मिळविण्यासाठी सातत्यपूर्ण शिक्षणातून (काँस्टंट लर्निंग) कौशल्य (स्कील) आत्मसात केले पाहिजेत.’’ 

तरुणांनी कोणत्याही कामास कमी लेखू नये. कोठेही जाऊन कौशल्य विकसित करण्याची तयारी ठेवावी. त्यामध्ये पहिल्या नोकरीत कंपनीमध्ये अपेक्षेपेक्षा कमी पगार मिळाला, तरी भविष्यातील यशाची पहिली पायरी म्हणून ती चढली पाहिजे. नोकरीला लागल्यानंतर दर दोन-तीन वर्षांनी कौशल्य विकासावर भर देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

‘एमकेसीएल’चे संचालक विवेक सावंत म्हणाले, ‘‘आतापर्यंत जगभरात पर्यावरणाचा खूप ऱ्हास झाला आहे. आताच्या युवकांपुढे आपली पृथ्वी दुरुस्त करण्याची आणि त्यातून नोकरी मिळविण्याची मोठी संधी आहे. या ‘ग्रीन कॉलर जॉब’मध्ये शाळा सोडलेल्या तरुणांपासून ते संशोधकांपर्यंतच्या वर्गाला संधी आहे. सध्या या क्षेत्रात केवळ ४ टक्के रोजगार असले, तरी २०३५ पर्यंत यात २५ टक्के नोकऱ्या उपलब्ध होतील. कॉम्प्युटर, स्मार्टफोन आणि इंटरनेट याच्या साह्याने ‘न्यू कॉलर जॉब’ उपलब्ध होतील.’’

रोजगाराविषयी...

  • ‘मॅकेंझी’च्या अहवालानुसार २०३०पर्यंत दरवर्षी ९० लाख नोकऱ्यांची निर्मिती आवश्‍यक 
  • पर्यावरण क्षेत्रात रोजगाराची मोठी संधी 
  • डिजिटल शिक्षण, प्रत्यक्ष काम यास महत्त्व 
  • एकाच पदवी आयुष्यभर नोकरी टिकणे अशक्‍य

प्रतीक्षा रोजगाराच्या संधीची
उच्चशिक्षण झाल्यानंतर कुटुंबीयांच्या अपेक्षाही वाढतात. घरची आर्थिक जबाबदारी खांद्यावर येते. परंतु, रोजगाराच्या मर्यादित संधी असल्याने संघर्ष करावा लागत आहे. त्याचबरोबर आर्थिक, कौटुंबिक अडचणींमुळे आलेल्या उदासीनतेचा सामना करावा लागत असल्याची भावना युवकांनी व्यक्त केली आहे.

युवा दिनानिमित्त युवकांशी ‘सकाळ’ने संवाद साधला. रोजगाराच्या संधींचा अभाव ही आजच्या युवकासमोरची मोठी समस्या असून, तिच्या निवारणासाठी प्रयत्न होताना दिसत नाही. त्यामुळे युवक अपेक्षा आणि उपलब्ध कौशल्याधारीत संसाधनांची कमतरता, या कात्रीत सापडल्याचे चित्र दिसत आहे. 

नवीन रोजगाराच्या संधी युवकांपर्यंत पोहचताच असे नाही. प्रत्येकाने आपल्या उराशी काही अपेक्षा बाळगलेल्या असतात. त्यांची पूर्तता झाली नाही, तर युवकांना तणावाचा सामना करावा लागत आहे.
- निकिता कांबळे

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()