लोहगाव-वाघोली रस्त्यावरील कर्मभूमी जवळ पाण्यात पडून युवकाचा मृत्यू

लोहगाव-वाघोली रस्त्यावरील कर्मभूमीनगरजवळ साचलेल्या पाण्यात पडून युवकाचा मृत्यू झाला.
sayaji waghmare
sayaji waghmaresakal
Updated on
Summary

लोहगाव-वाघोली रस्त्यावरील कर्मभूमीनगरजवळ साचलेल्या पाण्यात पडून युवकाचा मृत्यू झाला.

विश्रांतवाडी - लोहगाव-वाघोली रस्त्यावरील कर्मभूमीनगरजवळ साचलेल्या पाण्यात पडून युवकाचा मृत्यू झाला. गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास घरी जात असताना सयाजी जगन्नाथ वाघमारे (वय 25, सध्या रा. सुभाष काळभोर यांचे भाडेकरी, दत्त मंदिरासमोर, लोहगाव. मूळ रा. पंढरपूर) यांचे कर्मभूमी नगरजवळ साचलेल्या पाण्यात पडून मृत्यू झाला. वाघमारे हे दुचाकीवरून येत असताना दुचाकी पाण्यात पडून बुडून त्याचा मृत्यू झाला. वाघमारे हे मूळचे पंढरपूर येथील असून ते काळभोर यांच्या घरी भाड्याने राहत होते. ते डम्पर चालवायचे काम करत होते.

यामुळे परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत. ही बाब गंभीर असून आणखी किती बळी गेल्यानंतर प्रशासन जागे होणार. गेल्या आठ दिवसापासून पाणी साचून आहे. पाण्याचा निचरा करण्यासाठी प्रयत्न व्हावेत अशी विनंती नागरिकांनी केली आहे. या प्रश्नाकडे प्रशासन डोळेझाक करत असून प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी या ठिकाणी लोहगाव - वाघोली रस्ता विकास मंचाकडून रास्ता रोको करण्यात आले.

या रास्ता रोकोमध्ये मोहनराव शिंदे, दिपक काळुराम खांदवे, स्वप्नील खांदवे, मदन मोहन ठाकूर, विनायक शिंदे, गणेश वाघे, उद्धव जाधव, बालू वरपे, अक्षय शिंदे, निलेश खूने, कुंदन पाटील,प्रेम चौधरी यासह लोहगाव-वाघोली नागरिक विकास मंचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

यासंदर्भात दिपक खांदवे म्हणाले, महापालिका प्रशासन आणखी किती बळी गेल्यानंतर जागे होणार आहे. रोज याठिकाणी अपघात होत असून घरात, दुकानात पाणी जातं आहे. वाहतूक कोंडी होत असल्याने शाळेच्या स्कुल बसला शाळेत पोहचायला उशीर होत आहे. प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष द्यावे. यासंदर्भात पथ विभागाचे मुख्य अभियंता व्ही. जी. कुलकर्णी म्हणाले की येथे पावसाळी लाईन नाही. तसेच ड्रेनेज लाईन छोटी असून त्यात गाळ साचल्याने पाणी पूर्ण क्षमतेने पुढे जात नाही.

यासंदर्भात मलनिस्सारण विभागाचे उपअभियंता विनायक शिंदे म्हणाले की आम्ही प्रयत्न करत आहोत. पण रस्त्याच्या पलीकडे असणारे स्थानिक रहिवासी चर खोदण्यास वा पाईप टाकण्यास परवानगी देत नसल्याने काम थांबले आहे. गरज पडली तर पोलीसतक्रार करून काम करून ही समस्या लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.