Pune Crime : जमिनीच्या वादाचा राग मनात ठेवून खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी; मुलाचं टाेकाचं पाऊल

दिव्यांग पित्याच्या पाठपुराव्यानंतर मंचर पोलिसांनी तब्बल तीन महिन्यांनी दाखल केला गुन्हा:पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिला न्याय
youth end his life due to threat of fake crime case land dispute police
youth end his life due to threat of fake crime case land dispute policeSakal
Updated on

मंचर : पारगाव तर्फे खेड जाधववस्ती (ता.आंबेगाव) येथे जमिनीच्या वादाचा राग मनात धरून अल्पवयीन मुलगा सागर जाधवला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देउन आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आले. याप्रकरणी दिव्यांग पित्याने सतत पाठपुरावा मंचर पोलिसांकडे केला. पण दाखल घेतली जात नव्हती.

पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची भेट घेतल्यानंतर मंचर पोलीस ठाण्यात शनिवारी (ता.१३) दोनजणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तब्बल तीन महिन्याने दिव्यांग पित्याला न्याय मिळाला आहे.

याबाबत सागरचे वडील अशोक गोविंद जाधव (रा.पारगाव तर्फे खेड जाधववस्ती) यांनी शनिवारी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी रंजना भगवान जाधव व रामदास गेनभाऊ जाधव (दोघे रा.पारगाव तर्फे खेड जाधववस्ती) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

अशोक जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार “ता.२६ जानेवारीला सागर संध्याकाळी घरी आला. त्यांने सांगितले की, “मी शेतात गवत कापण्यासाठी गेलो होतो. रंजना जाधव यांचे घरी विळा मागण्यासाठी गेलो. त्यावेळी त्यांनी मला विळा दिला.

मात्र काही कारण नसताना शिवीगाळ केली. विळा परत देण्यासाठी गेलो. त्यावेळी पुन्हा मला शिवीगाळ केली. त्यानंतर संध्याकाळी चुलत भाऊ रामदास जाधव मोबाईलवरून मला म्हणाला, “तुझ्या मुलाने रंजनाला विळा देत असताना पाठीमागून मिठी मारली आहे.

त्याला मला भेटण्यास पाठव.” त्यानुसार माझा मोठा मुलगा धनेश व सागर दोघे रामदासला भेटले. रामदास म्हणाला, “तु रंजना बरोबर काय केले. आम्ही तुझ्यावर बलात्काराची केस टाकणार आहे. तुला जेलमध्ये पाठवणार आहे, तुला पोलिसांचे पट्टे टाकणार, तुझे वडील पांगळे आहेत. तुम्हाला काय करता येणार नाही. तसेच तुला उद्या गावात सगळ्यांसमोर फटके देतो.

तुझ्या बापाची काय अब्रू राहील. आम्ही तुम्हाला सोडणार नाही. तुमच्या वहीवटीची जमीन आम्ही केली. त्यावर तुझ्या बापाने काय केले.” त्यानंतर मुलांनी घरी येऊन सर्व सांगितले. सागर म्हणाला, “मी चुलती बरोबर काहीही केले नाही. माझ्यावर खोटा आरोप केला आहे. ”

रात्री जेवण झाल्यानंतर सागर घरातून बाहेर गेला. उशिरापर्यंत घरी न आल्याने त्याचा शोध घेतला. झाडाला दोरीच्या सहाय्याने त्याने गळफास घेतला होता. मंचर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी सागर मृत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या प्रकरणी पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक बालाजी कांबळे करत आहेत.

“मंचर पोलीस ठाण्यात १४ वेळा चकरा मारल्या पण पोलीस गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ करत होते. शुक्रवारी (ता.१२) पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे व पोलीस उपअधीक्षक युवराज मोहिते यांची पुणे येथे भेट घेतली. सविस्तर पुराव्यासह माहिती दिली. त्यांच्या आदेशामुळेच माझ्या सागरला न्याय मिळाला.”

- अशोक जाधव, दिव्यांग फिर्यादी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.