Sanjay Kirloskar : देशाच्या धोरणात्मक निर्णयात परिवर्तनात्मक प्रभाव पाडण्यासाठी तरूणांनी नेतृत्व करावे : संजय किर्लोस्कर

Sanjay Kirloskar : तरूणांनी देशाच्या धोरणात्मक निर्णयांवर प्रभाव टाकण्यासाठी नेतृत्व करणे आवश्यक आहे, असे संजय किर्लोस्कर यांनी सांगितले.
Sanjay Kirloskar
Sanjay Kirloskarsakal
Updated on

पुणे : ‘विकसित भारताचे स्वप्नं साकार करण्यासाठी पुढील काही दशकांत वेगाने प्रगती करावी लागेल. हवामान बदल, उत्पन्नातील असमानता, जलदगतीने होणारे शहरीकरण, जागतिक आर्थिक अनिश्चितता या अडथळ्यांवर मात करून पुढे जावे लागणार आहे.

देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी नव्याने पदवीधर होणाऱ्या तरूणांनी आव्हानांकडे संधी म्हणून पाहायला हवे. या संधीचा फायदा घेत देशाच्या धोरणात्मक निर्णयात परिवर्तनात्मक प्रभाव पाडण्यासाठी नेतृत्व करायला हवे,’’ असा सल्ला किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय किर्लोस्कर यांनी दिला.

गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेच्या (अभिमत विद्यापीठ) ३० वा पदवी प्रदान सोहळा शनिवारी झाला. यावेळी किर्लोस्कर बोलत होते. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, गोखले संस्थेचे कुलगुरू डॉ. अजित रानडे, कुलसचिव कर्नल कपिल जोध उपस्थित होते. या सोहळ्यात ४४० विद्यार्थ्यांना पदवी देण्यात आली. यात नऊ पीएच.डी धारक, ११३ पदवीधर, २९४ पदव्युत्तर पदवी, २४ पदव्युत्तर पदवी (प्रोग्रॅम इन फायनान्शिअल इकनॉमिक्स) या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

किर्लोस्कर म्हणाले,‘‘जगातील अनेक विकसित देश सध्या आपल्या देशात उत्पादन परत आणण्याचा निश्चितपणे प्रयत्न करत आहेत. त्याचवेळी युरोप आणि अमेरिका हरित नोकऱ्या देण्यासाठी पुढे येत आहेत. याद्वारे संबंधित देश तथाकथित हरित तंत्रज्ञानामध्ये आघाडीवर येण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

अर्थात, याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर कोणताही परिणाम होणार नाही. रोजगाराच्या निर्णयाचा परिणाम तपासणे, भौतिक व्यवस्थापनाला प्राधान्य, असमानता कमी करणे आणि शाश्वत विकासाचे प्रारूप विकसित करण्यात नव्याने पदवीधर होणाऱ्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. ग्रामीण भागातील डिजिटल साक्षरतेची कमतरता, पायाभूत सुविधांचा अभाव आणि अपुरी कनेक्टिव्हिटी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.’’

‘‘देशाच्या विकासासाठी तरूणांनी सचोटी आणि निष्ठेने नेतृत्व करण्यासाठी पुढे यायला हवे. देशाच्या धोरणात्मक निर्णयातही तुमचे योगदान असायला हवे,’’ असेही किर्लोस्कर यांनी अधोरेखित केले. डॉ. गोसावी म्हणाले,‘‘गोखले संस्थेची परंपरा आणि मूल्य नव्याने पदवीधर झालेले विद्यार्थी कायम पुढे नेतील.

आत्मसंतुष्ट, गतिमान आणि भरपूर आव्हाने असणाऱ्या जगात पाऊल ठेवत असताना, तुम्हाला अनेक संधीही उपलब्ध आहेत. गोखले संस्थेने भारतीय सामाजिक-आर्थिक समस्यांवर विश्लेषणात्मक संशोधनाचे महत्त्वपूर्ण काम केले आहे. त्या-त्या काळातील आव्हाने आणि समस्यांवर उपाय शोधण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

यात आर्थिक विषमता, हवामान बदल, जागतिक प्रशासन अशा आव्हानांचाही समावेश आहे. तुम्ही तुमची प्रतिभा मोठे ध्येय गाठण्यासाठी कशी वापराल, हे महत्त्वाचे ठरणार आहे. देशाच्या आर्थिक आणि राजकीय व्यवस्थेवर प्रभाव टाकण्याच्यादृष्टीने तुमचा प्रयत्न असायला हवा.’’ यावेळी डॉ. रानडे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.