अंधश्रद्धा पसरवित असल्याचा व्हिडीओ युट्युबवर; महिलेस मारहाण, चपलेचा हार घालून केली बदनामी

तृतीयपंथीयासह अकरा जणांविरुद्ध विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
YouTube video spread superstition Women were beaten slandered by wearing slippers crime against 11 accused pune
YouTube video spread superstition Women were beaten slandered by wearing slippers crime against 11 accused punesakal
Updated on

पुणे : ध्वनिचित्रफीतीद्वारे अंधश्रद्ध पसरवित असल्याचे वृत्त युट्युब वाहिनीवर प्रसारित केल्याच्या रागातून एका महिलेस तृतीयपंथीय व त्याच्यासमवेतच्या महिलांनी जबर मारहाण केली. संबंधित महिलेस डांबून ठेवत तिच्या गळ्यात चपलांचा हार घालून तिला माफी मागण्यास लावल्याचा व्हिडीओही संबंधित व्यक्तीने प्रसारीत करून महिलेची बदनामी केली. हि घटना विश्रांतवाडी परिसरात 23 जुन रोजी घडली आहे. याप्रकरणी तृतीयपंथीयासह अकरा जणांविरुद्ध विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सागर पोपट शिंदे उर्फ शिवलक्ष्मी संजय झाल्टे यांच्यासह बारा जणांविरुद्ध विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 40 वर्षीय महिलेने विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या मुळच्या बारामती येथील असून त्या समाजमाध्यमावर वृत्तवाहिनी चालवितात. तर संशयित आरोपी शिंदे हा तृतीयपंथी असून तो देखील समाजमाध्यमावर एक वृत्तवाहिनी चालवितो. दरम्यान, शिंदे याने अंधश्रद्धा पसरविण्यासाठीचा एक व्हिडीओ प्रसारित केला होता.

हा प्रकार फिर्यादी महिलेच्या लक्षात आला. त्यानंतर तिने शिंदे अंधश्रद्धा पसरवित असल्याचा व्हिडीओ तिच्या युट्युब वाहिनीवर प्रसारित केली होती. या घटनेनंतर शिंदे व फिर्यादीचे वाद झाले होते. त्यावेळी फिर्यादी महिलेने त्याची माफी मागितली होती. त्यानंतर त्याने फिर्यादी महिलेस पुन्हा एकदा माफी मागण्यासाठी विश्रांतवाडी येथील चौधरीनगर भागात बोलावून घेतले होते. तेथेच त्याने फिर्यादी महिलेस एका इमारतीच्या छतावर डांबून ठेवत तिला मारहाण केली होती. त्यानंतर महिलेस चपलांचा हार घालून ती माफी मागत असल्याचा व्हिडीओ त्याने प्रसारीत केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.