माळेगाव ः महाराष्ट्र हे प्रगत आणि मोठे राज्य आहे. या राज्यात मनुष्यबळ मुल्यांक वाढविण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग विचारात घेवून शासकिय आद्यौगिक प्रशिक्षण संस्थांनी कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातर्गंत लक्षवेधी काम सुरू केले आहे. त्याचा अधिकाधिक विद्यार्थी व पालकांनी लाभ घेतला पाहिजे, असे आवाहन परिवहन विभाग (मुंबई) उपायुक्त राजेंद्र मदने यांनी माळेगाव (ता. बारामती) येथे केले.
राज्य सरकार रोजगार व स्वयंरोजगारासाठी इच्छुक तरुणांना प्राधान्याने स्थानिक भागात रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यानुसार माळेगाव येथील शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने आज (शनिवारी) छत्रपती शाहु महाराज युवाशक्ती करिअर शिबीराचे आयोजित केले होते. या शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी परिवहन विभागाचे उपायुक्त राजेंद्र मदने बोलत होते. तंत्रज्ञान क्षेत्रात युवाशक्ती अधिक समृद्ध होण्यासाठी माळेगावचे युवाशक्ती करिअर शिबीर सर्वांर्थाने फायद्याचे ठरणार आहे. त्यानुसार कौशल्य, दर्जेदार शिक्षण-प्रशिक्षण आणि रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधीचा तरुणांना लाभ होणार आहे, असा विश्वास यावेळी अधिकारी मदने यांनी व्यक्त केला. ड्रोन,सोलर पॅनल आदी साधन सामुग्रीसह विविध क्षेत्रात आता अधुनिक तंत्रज्ञान विकसित होत असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष अॅड. केशवराव जगताप यांनी १० वी १ २ वी नंतरच्या करिअरच्या संधी, व्यक्तीमत्व विकास, रोजगाराच्या संधी, बॅंकेच्या विविध शैक्षणाक कर्ज योजना आदी मुद्यांच्या आधारे उपस्थित विद्यार्थ्यांना मिळालेले मार्गदर्शन निश्चितच फायद्याचे ठरले असे सांगितले. सचिव डाॅ. धनंजय ठोंबरे म्हणाले, की यापुढे तंत्रज्ञान कोणासाठी थांबणार नाही. ते अद्ययावत तंत्रज्ञान स्वीकारूनच आपल्याला पुढे जावे लागणार आहे. या तंत्रज्ञानाच्या आधारे विविध क्षेत्रातील प्राॅब्रोल सोडविणे ज्या विद्यार्थ्याला शक्य होणार आहे, त्यांना कोठे नोकरी मागणीची वेळ येणार नाही. त्यामुळे युवाकांनी स्वतःला बदलविणे गरजेचे आहे. आई-वडीलांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी तंत्रज्ञानाने समृद्ध झाले पाहिजे. डाॅ. सुनिल चोरे यांनीही करिअरचा रोड मॅफ उपस्थितांपुढे मांडला. आपल्या आजूबाजूला डोळसपणे बघितल्यावर लोकांच्या गरजेतून नवीन कल्पना पुढे येतात. त्यातून बाजारपेठ कशी काबीज करता येईल, आपली कंपनी कशी मोठी होईल, याबद्दलचे डाॅ. चोरे यांचे मार्गदर्शन महत्वपुर्ण ठरले. यावेळी माजी सरपंच दीपक तावरे, औद्योगिक प्रशिक्षण संस्था (माळेगाव) प्राचार्य़ ए.डी. जाधव, उद्योजक धनंजय जामदार, अॅड.राहूल तावरे, बी.एस.तावरे, शिल्प निदेशक एस.टी.पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते. कार्य़क्रमाचे सूत्रसंचालन किरण झरकर यांनी केले, तर आभार प्राचार्य़ जाधव यांनी मानले.
सकारात्मक मानसिकता ही यशस्वीतेची गुरूकिल्ली आहे. भारतामध्ये करिअरच्या वाटा शोधण्याबरोबरच जगात कोठेही जाण्याची तयारी ठेवा. त्यासाठी विद्यार्थानी इंग्रजी भाषेचे ज्ञान उत्तम पद्धतीने आत्मसात केले पाहिजे. तसे झाल्यास आपला आत्मविश्वास अधिकाधिक वाढतो आणि आपले ध्येय प्राप्त होते, असा सल्ला उपायुक्त राजेंद्र मदने यांनी विद्यार्थ्यांना दिला. यावेळी त्यांनी अर्थिक दृष्या सामान्य विद्यार्थ्यांना पासपोर्ट काढण्यासाठी मदत केली जाईल अशी ग्वाही दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.