Zika Virus : झिकाचा धोका! आणखी सहा जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवले; 'अशी' घ्या काळजी

Zika Virus
Zika Virusesakal

पुणेः शहरात झिकाचे रूग्ण आढळल्यानंतर महापालिकेने सर्वेक्षण करुन रूग्णालयांकडून माहिती गोळा करण्यास सुरूवात केली आहे. दरम्यान, आणखी सहा जणांच्या रक्ताचे नमुने तपासण्यासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.

मुंढवा व एरंडवणे येथे झिकाचे रूग्ण आढळले होते. दरम्यान, मुंढवा येथील १३ जणांचे, तर एरंडवणे येथील ३ जणांचे रक्ताचे नमुने तपासण्यासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यानंतर शुक्रवारी एरंडवणे येथील ३ व मुंढवा येथील ३ अशा आणखी सहा जणांचे नमुने तपासण्यासाठी पाठविण्यात आले.

Zika Virus
T20 World Cup 2024: टीका झाली, पण भिडू घाबरला नाय! फायनलमध्ये दुबेने दाखवली बॅटची ताकद

दरम्यान, मुंढवा येथील १३ जणांच्या रक्त तपासणीचा अहवाल आला, त्यामध्ये 12 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले, तर एका तरुणाचा अहवाल पॉझिटीव्ह आला असून त्यास केवळ डोकेदुखीचा त्रास झाला होता. तरूणाची तब्येत ठिक असल्याची माहिती महापालिकेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ.राजेश दिघे यांनी दिली. महापालिकेकडून सर्वेक्षण करून डास उत्पत्ती होणारे ठिकाणे शोधून नष्ट केली जात आहे. नागरिकांनीही डासांपासून संरक्षण व्हावे, यादृष्टीने काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

Zika Virus
Virat Kohli : टी 20 वर्ल्डकपच्या फायनलचा किंग! विराटच्या संथ अर्धशतकानं पकडला वेग, रोहितचा विश्वास ठरवला सार्थ

अशी घ्या काळजी

- संपूर्ण शरीर झाकले जाईल, असे अंगभर कपडे परिधान करावे

- दिवसाही डासांना पळवून लावणारी क्रीम अंगाला लावावी

- रात्री व दिवसा झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा

- फ्रीज, कुलर, झाडे, कुंड्या व अन्य ठिकाणी पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी

- गर्भवती स्त्रीयांनी डासांपासून संरक्षण होईल, यादृष्टीने काळजी घ्यावी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com