सरकारी कर्मचारी बदल्या रद्दचा 'नांदेड-लातूर पॅटर्न' पुण्यात राबवा; जिल्हाधिकाऱ्यांकडे कुणी केली मागणी?

IAS_Naval_Kishor_Ram
IAS_Naval_Kishor_Ram
Updated on

पुणे : पुणे जिल्ह्याच्या तुलनेत मराठवाड्यातील नांदेड आणि लातूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या खूपच अल्प आहे. तरीसुद्धा कोरोना संसर्ग वाढू नये, या उद्देशाने तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापन आणि निवारण विभागाचे अध्यक्ष या नात्याने त्यांच्या अधिकारात आपापल्या जिल्ह्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या यंदा रद्द केलेल्या आहेत.

बदल्या रद्दचा हा नांदेड आणि लातूर पॅटर्न पुणे जिल्ह्यातही राबवा आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या बदल्या रद्द करा, अशी मागणी जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेने जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे केली आहे.

पुणे जिल्ह्यात कोरोनाचे संकट वाढू लागले आहे. बदलीसाठी पात्र असलेले अनेक कर्मचारी सध्या जिल्ह्यातील विविध कोवीड केअर सेंटर्स, क्वॉरंटाईन सेंटर्स, आयसोलेशन सेंटर्स आणि तपासणी नाक्यांवर सेवा बजावत आहेत. 

शिवाय कोरोना संसर्गाच्या भीतीने खासगी गाड्या मिळत नाहीत. यामुळे बदलीच्या ठिकाणी रूजू होण्यास जाण्यासाठी अडचणी आहेत. तसेच बदलीच्या नव्या ठिकाणी राहण्यासाठी घर भाड्याने मिळणे अवघड आहे. मुलांच्या शाळांचे प्रवेश मिळणे अशक्य आहे. या सर्व बाबींचा विचार करून यंदाच्या बदल्या रद्द कराव्यात, अशी मागणी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेचे राज्य कोषाध्यक्ष उमाकांत सुर्यवंशी आणि पुणे जिल्हा अध्यक्ष शेखर गायकवाड यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे केली आहे. 

झेडपी सीईओंचे आभार 

सध्या कोरोनाचे संकट असूनही गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वरिष्ठ सहाय्यकांच्या पदोन्नत्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी केल्या. यानुसार वरिष्ठ सहाय्यकांना कनिष्ठ प्रशासकीय अधिकारी पदी नियुक्ती देण्यात आली आहे. याबद्दल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रसाद यांचा सत्कार केला आणि त्यांचे आभार मानले आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.