National Tourism Day : ट्रेकिंग करायला आवडतं? मग ही काही दूर्मिळ ठिकाणं करून बघा एक्सप्लोअर

आज आपण ट्रेकिंग आणि कँपिंगसाठी बेस्ट असणाऱ्या अशा ठिकाणाबाबत जाणून घेणार आहोत जे अनेकांना माहिती नाही
National Tourism Day
National Tourism Dayesakal
Updated on

National Tourism Day : पर्यटनाची हौस असणाऱ्यांसाठी आजच्या दिवसाचं विशेष महत्व आहे. आज आहे जागतिक पर्यटन दिन. या दिनाच्या निमित्ताने आज आपण ट्रेकिंग आणि कँपिंगसाठी बेस्ट असणाऱ्या अशा ठिकाणाबाबत जाणून घेणार आहोत जे अनेकांना माहिती नाही.

आधी आपण कँपिंगसाठी बेस्ट असणारी ठिकाणं जाणून घेऊया

१. रायलिंग पठार

पुण्यापासून ८० किमी अंतरावर असलेले हे ठिकाण कॅम्पिंग साठी चांगलं आहे. इथे जायचे असल्यास पुणे-सातारा हायवे वर नसरापूर पासून वरच्या अंगाला वळून आत गेल्या नंतर वेल्हे गावामार्गे जावे लागते.वाटेत तोरणा किल्ला देखील लागतो. मोहरी गावात गाड्या लावून अंदाजे ३० मिनिटाच्या trail नंतर रायलिंग पठार लागते.याची खासियत म्हणजे यावरून लिंगाणा समोरच दिसतो आणि पलीकडे रायगड किल्ला दिसतो.यामुळेच या पठाराला राय-लिंग असे नाव पडले आहे. टेन्ट मधून रायलिंगचा सुळका आणि त्यापलीकडे रायगड पाहताना अद्भुत समाधान मिळते.

हिवाळ्यात किंवा उन्हाळ्यात कॅम्पिंग करू शकता, पावसाळ्यात १ दिवसाचा प्लॅन करू शकता. रस्ता बऱ्या पैकी चांगला आहे. मोहरी गावातील लोक चहा नाश्त्याची व जेवणाची सोयसुद्धा करतात.

२) कमळगड :

पुण्यापासून जवळपास १०० किमी अंतरावर महाबळेश्वरच्या जंगलात जास्त लोकांना माहित नाही असे ठिकाण. पुणे सातारा हायवे वरून खंडाळ्याचा खंबाटकी घाट ओलांडल्या नंतर सुरूर गावातून वाई साठी वरच्या अंगाला वळून वाई शहरातून धोम-बालकवाडी धरणांमार्गे जात येते. कोंढवली गावात शाळेच्या परिसरात गाड्या लावून ट्रेक ला सुरुवात होते. बहुतेक ट्रेकर्स कॅम्पिंग टाळतात कारण निर्जन स्थळ आहे आणि चारही बाजूंनी घनदाट जंगल आहे. ट्रेक मध्यम ते अवघड कॅटेगरीचा आहे. जंगलातून १ तासाचा ट्रेक आहे शेवटच्या टप्प्यात. कमळगडाला कत्तलगड असेही म्हणतात. या गडाची खासियत म्हणजे गडावर असलेली गारुची विहीर. गारु म्हणजे लाल माती. विहिरीत उतरण्याचे साहस केले तर worth आहे. इथेही सहसा हिवाळ्यात जावे. आणि जंगल ट्रेक असल्याने पहाटे पुण्यातून निघावे म्हणजे संध्याकाळ होण्याआधी आपण ट्रेक संपवलेला असावा. अंधार पडल्या नंतर जंगल भयानक वाटू लागते.

३) नीळकंठेश्वर :

हे ट्रेकिंगचे किंवा कँपिंगचे ठिकाण नाहीये. मात्र इथे काही प्रमाणात ट्रेकिंग सारखी चढाई करावी लागते. पुण्यापासून फक्त ३५-४० किमी अंतरावर हे ठिकाण आहे. सिंहगड रोड ने जावे लागते किंवा NDA रोड ने जाऊ शकता. वाटेत खडकवासल्याच्या बॅकवॉटर्स चे मस्त व्हीव्ह्ज आहेत. निळकंठेश्वराला मूळ पुणेकर महाशिवरात्रीला आवर्जून जातात. शंकराचे प्राचीन मंदिर आहे टेकडीवर. याची खासियत म्हणजे टोकावरून दिसणारा सनसेट. एकदम पिक्चर परफेक्ट सूर्यास्त दिसतो वरून. मागे वरसगाव धरण दिसते, त्याच्या अलीकडे टेकड्या आणि यामध्ये होणार सूर्यास्त.. अहाहा.. काय तो नजारा.. दुपारी १ च्या आसपास निघालात पुण्यातून तरीही चालेल. वाटेत बॅकवॉटर्स बघण्यात वेळ घालवता येतो.

रात्रीच्या वेळी ट्रेकिंग करण्यासाठी पुण्यात असणारी ठिकाणे

रात्रीच्या ट्रेकला जाण्याचा प्लान कधीही उत्तम. यामागचे कारण असे की दिवसा उन्हामुळे चढताना होणारी दमछाक काहींना सहन होत नाही, डीहायड्रेशन जास्त होते. रात्रीच्या ट्रेकलादेखील थोडीफार दमछाक होतेच पण उन्हामुळे होणार त्रास जाणवत नाही, दिवसाच्या तुलनेत रात्री डीहायड्रेशन कमी होते. थंड हवा चालू असते त्यामुळे ताजेतवाने वाटते.

पुण्याजवळील रात्री करण्यासारखे प्रसिद्ध ट्रेक हे बहुतेक नेहमीचेच वाटेवरचे आहेत कारण आडमार्गाच्या ट्रेकला रात्री सोबत मोठा ग्रुप असेल तरच करावा.

१) प्रसिद्ध असा K2S (कात्रज ते सिंहगड) :

पुण्यातील भटक्यांना किमान एकदा तरी करू वाटणारा हा ट्रेल कम ट्रेक प्रत्येक उन्हाळ्यात लोक आवर्जून करतात. होळीच्या आसपास सुरुवात होते ते जून च्या पहिल्या आठवड्यापर्यंत हा ट्रेक करता येतो. मार्चमध्ये नुकताच उन्हाळा सुरु झालेला असतो आणि उन्हाळ्यातील रात्री हा ट्रेक करताना आल्हाददायक फील होते. रात्री ११ च्या आसपास हा ट्रेक कात्रज नवीन बोगद्यावरून सुरु होऊन पहाटे सिंहगडच्या पायथ्याला पूर्ण होतो. जवळपास १५ किमी चा पल्ला आहे. गप्पाटप्पा करत, शॉर्ट ब्रेक घेत, रातकिड्यांची किर्र्किर्रर ऐकत आरामात जायचे. डिफिकल्टी लेवल मध्यम. वाट ही पायाखालची असल्याने जास्त त्रास होत नाही. सोबत जागेची माहिती असलेला किंवा एखादा अनुभवी कार्यकर्ता असेल तर उत्तम. शक्यतो हा ट्रेक बहुतेक लोक मोठ्या ग्रुपसोबत करतात.

राजगड

ट्रेकर कम्युनिटीतील चुकून एखादा अपवादच सापडेल कि ज्याने राजगड ट्रेक केला नाही. पण हाच ट्रेक रात्री केला तर त्याची मजाच वेगळी. राजगडला जाताना आरामात निघायचं पुण्यातून हलका डिनर करून. पायथ्याला गाड्या लावून हर हर महादेवच्या जयघोषाने मोहीम सुरु करायची. नवख्या ट्रेकरलादेखील सोपा आहे हा ट्रेक. चढताना जास्त दमछाक होत नाही, वाट अवघड नाही, रस्ता पायाखालचा,आणि वीकेंडला बाकीचे ट्रेकिंग ग्रुपदेखील वाटेत भेटत असतात. २ च्या आसपास वरती आरामात पोहोचता येते. त्यानंतर बालेकिल्ल्यावर थोडा अराम करून पहाटे माच्या फिराव्यात आणि शेवटी सूर्योदयाचा आनंद घ्यावा. वरती पाण्याचे टाके आहेत, बालेकिल्ल्यावर चहापाणी उरकून नाश्त्याला खाली यायचं. (Pune)

३) गरुडाचे घरटे तोरणा :

हा देखील ट्रेकर्सचा आवडता स्पॉट आहे. या ट्रेकला एन्ड्युरन्स जास्त लागतो. दिवसा जास्त एनर्जी लागते. रात्रीचा हा थोडा बरा. याची खासियत अशी कि रात्री ट्रेक करताना रमतगमत ट्रेक पूर्ण झाल्यानंतर उजाडल्या नंतर जेव्हा तुम्हाला कळतं कि आपण एवढा मोठा ट्रेक पूर्ण केला, तेव्हा खूप समाधान मिळते. या ट्रेकला जाताना बाटल्यांमध्ये ग्लुक्कोज पावडर भरून घ्यावी किंवा साधं लिंबू पाणी. (Tourism)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.