Viral Video: एक मिनिट उशीर झाला अन् माजी मंत्र्याचं विधानसभेचं मैदान हुकलं! अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी नेमकं काय घडलं?

Former Minister Anees Ahmed : नागपूर मध्य मतदारसंघात यावेळी काँग्रेसने युवा नेते बंटी शेळके यांना उमेदवारी दिल्याने अहमद नाराज झाले होते.
Anees Ahmed  With Prakash Ambedkar
Anees Ahmed With Prakash AmbedkarEsakal
Updated on

Maharashtra Assembly Election: राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी 29 ऑक्टोबरही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती. उपराजधानी असलेल्या नागपूरमधील नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघातून अवघे 1-2 मिनिटे उशीर झाल्याने माजी मंत्री अनीस अहमद यांना उमेदवारी अर्ज दाखल करता आला नाही.

विधानसभा निवडणुकीसाठी निवडूक आयोगाने अर्ज भरण्यासाठी 29 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 पर्यंत मुदत दिली होती. मात्र, अनिस अहमद अर्ज भरण्यासाठी निवडणूक कार्यालयात दुपारी 3 वाजून 1-2 मिनिटांनी दाखल झाले. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज दाखल करुन घेण्यास नकार दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.