'क्रिकेटमध्ये जसे दोन राखीव खेळाडू, तसेच भाजपकडे ईडी, सीबीआय'

Punjab Assembly Elections 2022 : मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.
'क्रिकेटमध्ये जसे दोन राखीव खेळाडू, तसेच भाजपकडे ईडी, सीबीआय'
Updated on

पंजाब विधानसभा निवडणुकीच्या (Punjab Assembly Elections 2022) पार्श्वभूमीवर काँग्रेस (Congress) आणि भाजपमध्ये (BJP) जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. पंजाब (Punjab) दौऱ्यावर असलेल्या छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांनी महागाईवरून केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. चंदीगडमध्ये त्यांनी पत्रकारांशी बोलताना वेगवेगळ्या मुद्दयांवरून भाजपला घेरलं. यावेळी त्यांनी ईडी, सीबीआय सारख्या तपास यंत्रणांवरून देखील टीका केली.

'क्रिकेटमध्ये जसे दोन राखीव खेळाडू, तसेच भाजपकडे ईडी, सीबीआय'
ममतांनी राज्यपालांना केलं ट्विटरवर ब्लॉक; केला गंभीर आरोप

केंद्रात मोदी सरकार आल्यापासून देशातील महागाईने जनता उद्ध्वस्त झाली असल्याचा आरोप त्यांनी केला. क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीनं ११ खेळाडूंव्यतिरीक्त २ खेळाडू राखीव असतात, तसेच ईडी, सीबीआय, आयटी आणि डीआरआय हे सुद्धा भाजपकडून निडणूक लढत असतात. तसंच त्यांनी असाही प्रश्न उपस्थित केला की, सर्व काळापैसा नोटाबंदींमध्ये संपला होता, तर आता लोकांकडे काळापैसा कसा सापडतोय.

'क्रिकेटमध्ये जसे दोन राखीव खेळाडू, तसेच भाजपकडे ईडी, सीबीआय'
लोकशाही ही 'वैयक्तिक' नियमानुसार नाही तर...: राज्यपालांनी ममतांना खडसावले

महागाईवर बोलताना भूपेश बघेल म्हणाले की, देशात पहिल्यांदाच पेट्रोल-डिझेलने शतक ठोकलं. LPG ने 1000 चा टप्पा गाठला, डाळी आणि तेलही महाग झालं. महागाई गेल्या 12 वर्षांच्या तुलनेत शिखरावर पोहोचली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.