'केजरीवालांनी अण्णा हजारेंशी गद्दारी केली म्हणून आपचा जन्म झाला'

Anna Hazare Arvind Kejriwal
Anna Hazare Arvind Kejriwalesakal
Updated on
Summary

'केजरीवालांचा पक्ष फसवणुकीतून जन्माला आलेला पक्ष आहे.'

आम आदमी पक्षाचे (Aam Aadmi Party) नेते भगवंत मान (Bhagwant Mann) पंजाबचे मुख्यमंत्री झाल्यानंतर भाजप (BJP) नेते अनिल विज (Anil Vij) यांनी पक्षाची खिल्ली उडवलीय. त्यानंतर हरियाणाचे मंत्री अनिल विज यांनी आप प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केलाय. अण्णा हजारेंच्या आंदोलनादरम्यान केलेल्या फसवणुकीतून पक्षाचा जन्म झालाय. अण्णा हजारे (Anna Hazare) आंदोलनासाठी बसले होते. मात्र, केजरीवालांनी राजकीय महत्त्वाकांक्षा ठेवून आंदोलनाच्या नावाखाली संघटना स्थापन केलीय, असा घणाघातही विज यांनी केलाय.

नुकतीच भगवंत मान यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलीय. त्यानंतर भाजप नेत्यानं आपवर जोरदार निशाणा साधलाय. अनिल विज म्हणाले, अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांचा पक्ष फसवणुकीतून जन्माला आलेला पक्ष आहे, त्यामुळं आम्ही याकडं फारसं लक्ष देत नाही.

अण्णा हजारे यांनी 2011 मध्ये दिल्लीतील इंडिया गेटवर भ्रष्टाचाराबाबत आंदोलन सुरू केलं होतं. या आंदोलनात अरविंद केजरीवाल यांच्यासह इतर लोकांचाही मोठा सहभाग होता. 2012 मध्ये अरविंद केजरीवालांनी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत आम आदमी पार्टीची स्थापना केली आणि विधानसभा निवडणूक लढवली. परंतु, केजरीवालांनी अण्णा हजारेंशी गद्दारी करून आपची स्थापना केल्याचा गंभीर आरोप विज यांनी केलाय.

ते पुढे म्हणाले, केजरीवालांच्या पक्षानं दिल्लीच्या रस्त्यांवर दारू विकण्याची कला पारंगत केलीय. त्यामुळं 'आप'च्या या कलेचं पंजाबमधील जनतेनंही कौतुक केलंय. राज्यात अमली पदार्थांचा मोठा व्यापार होतो. यामुळं आम आदमी पार्टीचं सरकार आल्यानंतर पंजाबमधील परिस्थिती आणखी बिकट होणार आहे, असंही त्यांनी शेवटी सांगितलं.

दरम्यान, 117 सदस्यीय पंजाब विधानसभेत आम आदमी पक्षानं 92 जागा जिंकल्या आहेत. त्याचबरोबर सत्ताधारी पक्ष काँग्रेसला (Congress Party) 18, शिरोमणी अकाली दलाला 3, भाजप 2 आणि बसपा व अपक्षांना प्रत्येकी एक जागा मिळालीय.

Anna Hazare Arvind Kejriwal
'नरेंद्र मोदींनंतर भाजप भारतात टिकणार नाही, पण काँग्रेस कायम राहील'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.