काँग्रेसमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर; सुनील जाखड यांचे मोठे विधान

Sunil Jakhar
Sunil JakharSunil Jakhar
Updated on

पंजाबमध्ये काँग्रेसच्या दारुण पराभवानंतर काँग्रेसमधील अंतर्गत कलहही चव्हाट्यावर येत आहे. नवज्योत सिंग सिद्धू मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असते तर परिवर्तनाचे वादळ थांबू शकले असते, असे वक्तव्य पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष सुनील जाखड (Sunil Jakhar) यांनी केले आहे. सुनील जाखड हे पंजाब काँग्रेसच्या बड्या नेत्यांपैकी एक आहेत.

काँग्रेसच्या पराभवावर सुनील जाखड वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले की, नवज्योतसिंग सिद्धू यांना संधी दिली असती, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले नसते, त्यांच्यावर बादलांशी संगनमत केल्याचा आरोप झाला नसता. मला वाटते सिद्धू हे बदल थांबवू शकले असते. आम्ही रोगाचे आकलन बरोबर केले असले तरी रोगावरील औषध चुकीचे होते. लोकांना बदल हवा होता, असे सुनील जाखड (Sunil Jakhar) कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याबद्दल म्हणाले.

Sunil Jakhar
भगवंत मान बुधवारी एकटेच घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ; येथे होणार सोहळा

काही लोक मला अपमानित करण्याचा प्रयत्न करीत होते. ते सर्व मुख्यमंत्री झाले होते. परंतु, आता ते स्वतःच विहिरीत पडले आहेत. पंजाबच्या जनतेचे खूप चांगला निर्णय घेतला आहे. पंजाबमधील जनतेने पंजाबमध्ये नवा पर्याय निवडला म्हणून मी त्यांचे अभिनंदन करतो, असे काँग्रेसच्या पराभवावर नवज्योतसिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) म्हणाले होते.

काँग्रेस (Congress) नवज्योत सिंग सिद्धू यांच्या डीएनएमध्ये नाही. त्यांना काँग्रेसची संस्कृती माहीत नाही. सिद्धू यांनी चन्नी आणि त्यांच्याच सरकारवर प्रश्नचिन्ह सुरू केले तेव्हा प्रियांका गांधी आणि राहुल गांधींनी त्यांना काँग्रेसमधून बाहेर फेकायला हवे होते, असे पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखजिंदर सिंग रंधावा म्हणाले. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने काँग्रेसचा सफाया केला. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला ९२ जागा मिळाल्या, तर काँग्रेसला केवळ १८ जागा मिळाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.