काँग्रेसचा मुख्यमंत्रीपदाचा चेहराच ठरला फेल; दोन्ही जागांवर पराभूत

पंजाबमधील काँग्रेसच्या पराभवाचं हेच प्रमुख कारण असल्याचं सांगितलं जातंय
charanjit-singh-channi
charanjit-singh-channiesakal
Updated on

चंदीगड : पंजाबमध्ये सत्तेत असलेल्या काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. या ठिकाणी आम आदमी पार्टीनं दणदणीत विजय मिळवला आहे. पण काँग्रेसच्या पराभवामागील प्रमुख कारणांपैकी मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नीच असल्याचं निवडणूक निकालाच्या कलांवरुन समोर आलं आहे. (Punjab Assembly Election Result Congress CM face Channi defeated in both seats)

काँग्रेसनं मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांना दोन जागांवर उमेदवारी जाहीर केली होती. यांपैकी चन्नींचा भदौरच्या जागेवरुन ३७,५५८ मतांनी तर चमकौर साहिब इथून ७,९४२ मतांनी पराभव झाला आहे. काँग्रेसनं चन्नी यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित केलं होतं. त्यामुळं चन्नी हे काँग्रेसचा पंजाबमधील मुख्य चेहरा होते. पण काँग्रेसचा हा प्रमुख चेहराच सपशेल अपयशी ठरला. एकूणच पंजाबमध्ये काँग्रेस पूर्णपणे अपयशी ठरली आहे.

दरम्यान, पंजाबमध्ये काँग्रेस आणि आम आदमी पार्टी (आप) यांच्यामध्येच मुख्य लढत मानली जात होती. पण आपनं इथं आश्चर्यकारकरित्या मुसंडी मारत पारंपारिक पक्ष असलेल्या काँग्रेस आणि शिरोमणी अकाली दलाला देखील धोबीपछाड दिली.

अमरिंदर सिंग यांना काँग्रेसनं जबरदस्तीनं मुख्यमंत्रीपदावरुन हटवल्याचंही पंजाबच्या जनतेला रुचलेलं नाही. कारण अमरिंदर सिंग यांनी सुरुवातीपासून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता. शेतकऱ्यांच्या पाठिशी ठामपणे उभ्या असलेल्या नेत्याला काँग्रेसनं हटवून चन्नींकडे जबाबदारी सोपवली होती. कदाचित यामुळंही नाराज मतदारांनी काँग्रेसला नाकारलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.