पतियाळा : आगामी विधानसभा निवडणुकीनंतर पंजाबमध्ये भाजप आघाडीचे सरकार स्थापन होईल, असा विश्वास माजी मुख्यमंत्री आणि पंजाब लोक कॉंग्रेसचे नेते कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी आणि अरविंद केजरीवाल यांची गोंधळलेली मनःस्थिती असून नवज्योत सिंग सिद्धू हे काही कामाचे नाहीत, असेही टीकास्त्र सोडले. (Punjab Assembly Election)
अमरिंदर सिंग पत्रकारांना म्हणाले की, पंजाबसाठी नवज्योत सिंग सिद्धू यांच्याकडे कोणतेही मॉडेल नाही आणि केजरीवाल यांच्याकडे कोणतेही दिल्लीचे मॉडेल नाही. पंजाबमध्ये केजरीवाल प्रत्येक मुलीला एक हजार रुपये देणार असल्याचे सांगत आहेत. पण ते दिल्लीत कोणत्याच मुलीला हजार रुपये देऊ शकले नाहीत. केजरीवाल यांनी तीन निवडणुका लढल्या आहेत. पण एका तरी महिलेला आमदार केले का? केजरीवाल पूर्णपणे गोंधळलेले आहेत.
भाजप, ढिंडसा यांचा पक्ष आणि आमच्या पक्षाने जाहीरनामा तयार केला आहे. आता तिघेही एकत्र येऊन समान किमान कार्यक्रम निश्चित करू, असेही कॅप्टन म्हणाले. राहुल आणि प्रियांका यांनी जनतेसमोर येऊन माझ्यासमवेत काय झाले, हे सांगणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा अमरिंदरसिंग यांनी व्यक्त केली.
सिद्धूने इम्रान यांना गोळीबार बंद करण्याचे सांगावे
पाकिस्तानचे पतंप्रधान इम्रान खान आणि नवज्योत सिंग सिद्धू हे खूपच जवळचे मित्र आहेत. म्हणून सिद्धू पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार काम करत असतील तर ते चुकीचे आहे. पाकमुळे दररोज आपले जवान हुतात्मा होत आहेत. सिद्धूत हिंमत असेल तर त्यांनी इम्रान खान यांना गोळीबार बंद करण्यास सांगावे. परंतु ते कधीही असे करणार नाहीत. सिद्धू म्हणतात की, इम्रान खान ‘यारो का यार’ आहे पण हाच ‘यारो का यार’ दररोज आपल्या देशावर हल्ले करत आहेत, असे कॅप्टन म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.