Punjab Assembly Election: स्थानिक नेते चन्नींच्या पाठीशी

दलित शीख अशी ओळख असलेल्या चन्नी यांच्या पाठीशी राज्यातील अनेक तगडे नेते उभे आहेत.
चरणजितसिंग चन्नी
चरणजितसिंग चन्नीsakal
Updated on

चंडीगड : पंजाबमध्ये पुन्हा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून चरणजितसिंग चन्नी (Charanjitsingh Channi) यांच्याच नावाची घोषणा केली जावी अशी आग्रही मागणी प्रदेश पातळीवरील नेत्यांकडून केली जाऊ लागली आहे. चन्नी हे हायकमांडची ‘निवड’ असून त्यांना पुन्हा संधी दिली जाऊ शकते. दलित शीख अशी ओळख असलेल्या चन्नी यांच्या पाठीशी राज्यातील अनेक तगडे नेते उभे आहेत. काँग्रेस हायकमांडने भविष्यातील वाद टाळण्यासाठी आधीपासूनच सामूदायिक नेतृत्वाखाली ही निवडणूक लढली जाईल अशी घोषणा करत सर्वच इच्छुकांना वेटिंगवर ठेवले आहे. (Punjab Assembly Election Updates)

पक्षाने २०१२ आणि २०१७ साली झालेल्या निवडणुकीच्यावेळी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार आधीच जाहीर केला होता. ताज्या घडामोडींवर भाष्य करताना माजीमंत्री आणि ज्येष्ठ नेते ब्रह्म मोहिंद्रा म्हणाले की, ‘‘केवळ तीन महिन्यांच्या काळामध्येच चन्नी यांनी ते स्वतःच या पदासाठी पात्र असल्याचे सिद्ध केले आहे. मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराबाबत पक्षामध्ये कोणत्याही प्रकारचा संभ्रम असता कामा नये कारण चन्नी यांनी त्यांची क्षमता सिद्ध केली आहे.’’ कॅ. अमरिंदरसिंग यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर नवज्योतसिंग सिद्धू यांना लगाम घालत काँग्रेस श्रेष्ठींनी चन्नी यांना मुख्यमंत्री केले होते.

चरणजितसिंग चन्नी
जामीनावर सुटल्यानंतरही सराईत गुन्हेगाराकडून पुन्हा घरफोडी

म्हणून काँग्रेसवर देखील दबाव

आम आदमी पक्षाने (आप) भगवंत मान यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केल्याने काँग्रेसमध्ये प्रदेश पातळीवर आपल्या पक्षाचा चेहरा जाहीर करण्याच्या मागणीने जोर धरला आहे. काँग्रेसचा प्रतिस्पर्धी असणाऱ्या शिरोमणी अकाली दलाने अद्याप मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केला नसला तरीसुद्धा पक्षाचे अध्यक्ष सुखबीरसिंग बादल हे मुख्यमंत्री होऊ शकतात, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

या नेत्यांचा पाठिंबा

मोहिंद्रा यांच्याप्रमाणेच राणागुरजित सिंग यांनी देखील चन्नी यांच्या नावाचे समर्थन केले आहे. चन्नी यांच्या नेतृत्वावर संशय घेणे हे पक्षासाठी आत्मघाती ठरू अशी भीती त्यांनी व्यक्त केली. कॅबिनेट मंत्री त्रिप्त राजिंदरसिंग बाजवा, शहाकोटचे आमदार हरदेवसिंग लड्डी शेरोवालिया यांनीही चन्नी यांचे समर्थन केले आहे.

‘ट्विटर’चा कौल चन्नींच्या बाजूने

राहुल गांधी यांचे सहकारी निखिल अल्वा यांनी ट्विटरवरील जनकौलाचा हवाला देताना चन्नी हेच मुख्यमंत्रिपदाचे प्रभावी उमेदवार असल्याचे म्हटले आहे. राज्यातील निवडक हजार लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले असता ६८.७ टक्के लोकांनी चन्नी यांच्या बाजून कौल दिल्याचे दिसून आले आहे. याला पूर्ण सर्वेक्षण म्हणता येणार नाही पण त्यातून लोकांच्या मनात नेमके काय चालले आहे, याचा अंदाज येऊ शकतो असेही त्यांनी नमूद केले. मध्यंतरी प्रदेश काँग्रेसच्या ट्विटर हॅंडलवरून एक व्हिडिओ प्रसिद्ध झाला होता त्यातही मुख्यमंत्रिपदासाठी चन्नी यांना पाठिंबा देण्यात आला होता.

चरणजितसिंग चन्नी
ट्रॅक्टर-दुचाकी अपघातात अनंतपूरमधील शिक्षक जागीच ठार

सिद्धूजी पंजाब काँग्रेसचे सरदार आहेत तर चन्नीजी हे राज्य सरकारचे सरदार. आमचा पक्ष दोघांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढतो आहे.

- रणदीप सुरजेवाला, प्रवक्ते काँग्रेस

चन्नी आणि सिद्धू हे दोघेही पंजाबच्या मुख्यमंत्रिपदासाठी पात्र नाहीत. ‘आप’चे मान हे कॉमेडियन आहेत, लोकांना गंभीर मुख्यमंत्री हवा आहे. केजरीवालांकडे पंजाबसाठी ठोस असे काही नाही.

- कॅ. अमरिंदरसिंग, माजी मुख्यमंत्री पंजाब

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.