Punjab Election: १९९३ बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषीवरून घाणेरडे राजकारण; केजरीवाल

या स्फोटात नऊ जण ठार, तर ३१ जण जखमी झाले होते.
अरविंद केजरीवाल
अरविंद केजरीवालsakal
Updated on

चंडीगड : शिरोमणी अकाली दल १९९३ च्या दिल्ली बॉम्बस्फोटातील दोषी देविंदरपालसिंग भुल्लर याच्यावरून घाणेरडे राजकारण करीत असल्याची टीका आपचे राष्ट्रीय समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी केली. (Punjab Assembly Election Updates)

रविवारी केजरीवाल यांची पत्रकार परिषद झाली. त्यावेळी शिख संघटनांतर्फे निदर्शने करण्यात आली. या स्फोटात नऊ जण ठार, तर ३१ जण जखमी झाले होते. भुल्लरला २००१ मध्ये टाडा न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा ठोठावली होती, पण २०१४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ती सौम्य करीत आजन्म कारावासाचा निर्णय दिला. अकाली दलाचे प्रमुख प्रकाशसिंग बादल यांनी यावरून आवाज उठविला होता.

पंजाबमधील शांतता आणि जातीय सलोखा भक्कम करण्याच्या व्यापक उद्देशाने भुल्लर यांची तातडीने सुटका करावी, अशी मागणी त्यांनी केली होती. यास केजरीवाल यांचा विरोध असल्याचा आरोपही त्यांनी केला. केजरीवाल यांनी मते मिळावीत म्हणून जातीय भेदभाव, राजकीय संधिसाधूपणा करू नये, असेही बादल म्हणाले. केंद्राने यात हस्तक्षेप करावा, असे आवाहनही त्यांनी केले. त्यावर केजरीवाल यांनी स्पष्ट केले की, हे प्रकरण संवेदनशील आहे. दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा नाही.

कायदा आणि सुव्यवस्था तसेच पोलिस हे केंद्राच्या म्हणजे नायब राज्यपालांच्या अखत्यारित येता. फाशी, जन्मठेप अशा शिक्षांचा आढावा घेण्यासाठी एक मंडळ नेमण्यात आले आहे. त्यात न्यायाधीश. पोलिस अधिकारी, सचिव आणि इतर सदस्य असतात. ते निर्णय घेतात. यात माझी कोणतीही भूमिका नाही. भुल्लर यांच्या प्रकरणाची मला माहिती मिळाली तेव्हा या मंडळाची बैठक बोलाविण्याची सूचना मी गृह सचिवांना दिली. त्यात जो काही निर्णय होईल तो नायब राज्यपालांना कळवावा असेही सांगितले.

अरविंद केजरीवाल
आकाशवाणीच्या स्थानिक केंद्रांवरील कार्यक्रम होणार बंद

केजरीवाल यांचे मुद्दे

  • मजिठीया यांना केवळ सिद्धू यांना हरविण्यात रस

  • आप सत्तेवर आल्यास सर्व सरकारी कार्यालयांत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगत सिंग यांची छायाचित्रे लावणार, तेथे कोणत्याही राजकीय नेत्याचे छायाचित्र नसेल

  • अमृतसरमधील जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष करीत काँग्रेसचे नवज्योतसिंग सिद्धू आणि शिरोमणी अकाली दलाचे बिक्रमसिंग मजिठीया शाब्दिक वादात व्यस्त

  • भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी नव्हे तर केवळ पुढील मुख्यमंत्री बनण्यासाठी सिद्धू रिंगणात, त्यांचा जनतेशी संवाद नाही

  • दुसरीकडे आपच्या उमेदवार जीवनज्योत कौर यांचा घरोघरी प्रचार, जनतेच्या समस्या ऐकण्यासाठी त्या नेहमीच उपलब्ध

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.