Punjab Election : CM चन्नींकडून आचारसंहितेचा भंग; गुन्हा दाखल

पंजाबमध्ये रविवारी विधानसभेच्या 117 जागांसाठी मतदान पार पडणार आहे.
Charanjit Singh Channi
Charanjit Singh ChanniSakal
Updated on

चंदीगड : पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी आणि काँग्रेसचे हलका मानसाचे उमेदवार शुभदीप सिंग सिद्धू उर्फ सिद्धू मुसेवाला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आचारसंहितेच्या (Code Of Conduct ) उल्लंघन केल्याप्रकरणी मानस पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पंजाबमध्ये रविवारी (दि.20) रोजी विधानसभेच्या 117 जागांसाठी मतदान पार पडणार असून, शुक्रवारी संध्याकाळपासून येथे आचारसंहिता लागू झाली आहे. (complaint Registered Against CM Channy For violates Code Of Conduct )

Charanjit Singh Channi
Jammu Kashmir : शोपियात दोन जवान शहीद; दहशतवाद्यांसोबत चकमक सुरु

शुक्रवारी सध्याकाळी 6 नंतर प्रचारचा कालावधी संपलेला असतादेखील चन्नी मानसातील बाजारपेठांमध्ये शुभदीप सिंग यांचा घरोघरी प्रचार करत होते. दरम्यान, हा सर्व प्रकार मानसाच्या रिटर्निंग ऑफिसरला समजताच त्यांनी घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तोपर्यंत चरणजीत सिंह चन्नी तेथून निघून गेले होते. या सर्व घटनेची माहिती आपण नागरिकांकडून घेत असल्याचे रिटर्निंग ऑफिसर यांनी सांगितले आहे.

Charanjit Singh Channi
दुसरा कोणी असता तर पदावर बसला नसता; राणेंचा CM ठाकरेंवर निशाणा

प्रचारात चन्नी नेमकं काय म्हणाले

मानसामध्ये मतदरांच्या भेटीदरम्यान काँग्रेस पक्षाच्या बाजूने मोठा कल मिळत असल्याचे चित्र आहे. मला मानसामध्ये येण्यास उशीर झाल्याने मी नागरिकांची भेट घेऊ शकलो नाही, असे सांगत चन्नी म्हणाले की, सिद्धू मुसेवाला एक होतकरू तरुण असून मी सर्व मतदारांना सिद्धू मुसेवालाला प्रचंड बहुमताने मतदान करण्याचे आवाहन करतो. कारण ज्यावेळी तुम्ही मुसेवाला यांची निवड कराल म्हणजे तुम्ही अप्रत्यक्षपणे माझी निवड कराल. त्यामुळे पंजाबमध्येही काँग्रेस पक्षाचे सरकार येण्यास मदत होईल. असे विधान चन्नींनी नागरिकांच्या भेटीदरम्यान केले आहे.

Charanjit Singh Channi
वाद थांबेना! आता राऊतांनी सोमय्यांना विचारले तीन प्रश्न, म्हणाले...

दरम्यान, संध्याकाळी 7:00 च्या सुमारास सीएम चन्नी आणि सिद्धू मुसेवाला त्रिवेणी मंदिराजवळ शेकडो लोक जमा करत असल्याची माहिती मिळाली, असे आपच्या जिल्हा शहरी अध्यक्ष कमल गोयल यांनी सांगितले. त्यानंतर घटनास्थळी भेट दिली असता, चन्नी नागरिकांना संबोधित करत होते, असे गोयल यांनी सांगितले. एवढेच नव्हे तर, यावेळी सिद्दू मुसेवाला तेथे उपस्थित होते असे देखील गोयल म्हणाल्या.

तसेच त्यावेळी तेथे शेकडो लोक उपस्थित होते. त्यामुळे जर आमच्यावर कारवाई होत असेल तर, कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करून मुख्यमंत्री चन्नी आणि घटनास्थळी उपस्थित नागरी व पोलीस प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी गोयल यांनी पंजाबच्या निवडणूक आयोगाकडे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.