पक्षानं घेतलेल्या प्रत्येक निर्णयाचं पालन करणार असल्याचं सिध्दूंनी स्पष्ट केलंय.
चंदीगड : पंजाबात काँग्रेसच्या (Punjab Congress) मुख्यमंत्र्याबाबत (Punjab Election 2022) सस्पेन्स कायम आहे. दरम्यान, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नवज्योतसिंह सिध्दू (Navjot Singh Sidhu) यांनी पक्षाच्या प्रत्येक निर्णयासोबत राहणार असल्याचं स्पष्ट केलंय. त्यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना सांगितलं की, हायकमांडला पंजाबची नस कळते, त्यामुळं काही झालं तरी मी शेवटच्या श्वासापर्यंत राहुल गांधींसोबत (Rahul Gandhi) राहणार आहे. काँग्रेस (Congress) रविवारी मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा करू शकते, असं वृत्त आहे. पंजाबमध्ये 20 फेब्रुवारीला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे.
पक्षानं घेतलेल्या प्रत्येक निर्णयाचं पालन करणार असल्याचं सिध्दूंनी स्पष्ट केलंय. ते म्हणाले, मी आताच काँग्रेसमध्ये आलो नाही. फार काळापासून मी काँग्रेसच्या विचारधारेशी एकनिष्ठ आहे. राज्यात मुख्यमंत्र्याचं नाव घोषित करावं, अशी मागणी दोन्ही नेत्यांकडून होत आहे. त्यामुळं हायकमांड कोणता निर्णय घेणार हे महत्वाचं ठरणार आहे.
सिध्दू पुढे म्हणाले, मला राज्यात कमकुवत मुख्यमंत्री (Punjab CM) नकोय. तर एका चांगल्या मुख्यमंत्र्याची गरज जनतेला आहे आणि तो निवडण्याचा अधिकारही त्यांनाच आहे. मात्र, काही लोकांना त्यांच्या तालावर नाचणारा कमकुवत मुख्यमंत्री हवाय, त्यामुळे आमचे नेते राहुल गांधी कोणता निर्णय घेणार, हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान, पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष सुनील जाखड (Sunil Jakhar) यांनी अलीकडेच सीएम चन्नी यांना विधानसभा निवडणुकीत आणखी काम करण्याची संधी द्यावी, असं म्हटलं होतं. यावर सिध्दू यांनी निशाणा साधत जाखड यांच्या विधानाचा समाचार घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.