नव्या खेळीत कॅप्टनची 'हिट विकेट', आपच्या कोहलींकडून पराभूत

कॅप्टन अमरिंदर सिंग हे पटियाला मतदारसंघातून निवडणूक हरले आहेत
Captain Amarinder Loses in Patiala
Captain Amarinder Loses in PatialaAmarinder Singh
Updated on

Punjab Election Result 2022 : पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पटियाला अर्बन मतदारसंघातून पराभव झाला आहे. पंजाबचे दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या 'कॅप्टन'चा आम आदमी पक्षाचे उमेदवार अजित पाल सिंग यांनी पराभव केला. यावेळी कॅप्टन काँग्रेसपासून वेगळा पक्ष स्थापन करून निवडणूक लढवत असून, त्यांनी यावेळी भाजपसोबत युती केली होती. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी स्वतःसाठी निवडलेली पटियालाची जागा त्यांनी 2017 मध्ये जिंकली होती. त्यावेळी त्यांनी आम आदमी पक्षाचे डॉ. बलबीर सिंग यांचा 52407 मतांनी पराभव केला होता. 2017 मध्ये येथे एकूण 68.29 टक्के मतदान झाले होते. (Punjab Assembly Election Captain Amarinder Loses Election From AAP Candidate)

Captain Amarinder Loses in Patiala
उत्तराखंडमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत; कोण होणार मुख्यमंत्री?

पटियाला कॅप्टनचा बालेकिल्ला

राज्यातील पटियाला मतदारसंघ कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा बालेकिल्ला मानला जातो. अमरिंदर 2002, 2007, 2012 आणि 2017 मध्ये सलग चार वेळा येथून आमदार झाले, तर 2014 मध्ये अमरिंदर सिंग यांनी अमृतसर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि जिंकल्यानंतर त्यांना त्यांची विधानसभा जागा सोडावी लागली. त्यांनी सोडलेल्या जागेवर त्यांच्या पत्नी प्रनीत कौर यांनी पोटनिवडणूक जिंकली. कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे वय 79 वर्षे असून, त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची एकूण संपत्ती 68.7 कोटी आहे.

Captain Amarinder Loses in Patiala
पंजाबमध्ये 'आप आये बहार आई' गाणं वाजण्यामागची पाच कारणं...

कॅप्टनने घेतली होती शहांची भेट

पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि पंजाबचे लोक काँग्रेसचे प्रमुख अमरिंदर सिंग यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यावेळी अमरिंदर सिंग यांनी दावा केला होता की, भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीने पंजाबमध्ये चांगली कामगिरी केली आहे. वास्तविक, पंजाबमध्ये पहिल्यांदाच भाजपने मोठ्या भावाच्या भूमिकेत निवडणूक लढवली आहे. भाजपची अमरिंदर सिंग यांच्या पंजाब लोक काँग्रेस आणि सुखदेव सिंग धिंडसा यांच्या शिरोमणी अकाली दल (संयुक्त) यांच्याशी युती केली आहे. अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाब लोक काँग्रेसच्या चांगल्या कामगिरीचा दावा केला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()