आम आदमी पक्षाचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असलेले भगवंत मान यांचा विजय झाल्यानंतर निवडणूक आयोगाने त्यांना प्रमाणपत्र दिलं.
आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार भगवंत मान पंजाबमधील संगरूर जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी पोहोचले आहेत. सातोज गावात पोहोचल्यानंतर गावकऱ्यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं. पोहोचले. मान यांनी धुरी मतदारसंघातून ८२,५९२ मतं मिळवली आहेत. तर आम आदमी पक्षाने 89 जागा जिंकल्या असून जागांवर अजूनही पक्षाचे उमेदवार आघाडीवर आहेत.
जनतेचा निर्णय नम्रपणे स्वीकारा. जनतेचा कौल ज्यांना मिळाला, त्यांना हार्दिक शुभेच्छा. काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांचं आणि स्वयंसेवकांचं त्यांच्या कठोर परिश्रम आणि समर्पणाबद्दल मी त्यांचं आभार मानतो. आम्ही यातून परभावातून शिकू आणि भारतातील लोकांच्या हितासाठी काम करत राहू. - राहुल गांधी
पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पटियाला अर्बन मतदारसंघातून पराभव झाला आहे. पंजाबचे दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या 'कॅप्टन'चा आम आदमी पक्षाचे उमेदवार अजित पाल सिंग यांनी पराभव केला.
"लोकांचा आवाज हा देवाचा आवाज आहे.... पंजाबच्या जनतेचा जनादेश नम्रपणे स्वीकारा.... आपचे अभिनंदन!!!” अशी प्रतिक्रिया पंजाब काँग्रेसचे प्रमुख नवज्योत सिंग सिद्धू यांनी व्यक्त केलं आहे.
पंजाबमध्ये तब्बल ९० जागांवर आघाडीवर असलेल्या आम आदमी पक्षाने जल्लोष सुरु केला आहे. त्यानंतर आता अरविंद केजरीवाल यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. या इंकलाब साठी पंजाबच्या लोकांना शुभेच्छा असं केजरीवाल म्हणाले.
पंजाबमधील मानसा येथील काँग्रेसचे उमेदवार, गायक सिद्धू मूसवाला हे आपच्या विजय सिंगला यांच्यापेक्षा १४,००० हजार मतांनी पिछाडीवर आहेत.
केजरीवाल यांच्या गव्हर्नन्सचा मॉडेलला पंजाबने संधी दिली आहे. आज त्यांचं मॉडेल राष्ट्रीय स्तरावर प्रस्थापित झालं आहे. हा 'आम आदमी' (सामान्य माणसाचा) विजय आहे. - मनिष सिसोदिया
सध्याचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी, नवज्योत सिंग सिद्धू, कॅप्टन अमरिंदर सिंग हे पिछाडीवर आहेत. हे सर्व मोठे चेहरे पिछाडीवर असल्याने या निकालांबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.
सोनू सूदची बहीण मालविका मोगा मतदारसंघातून पिछाडीवर आहे. त्या मोगा मतदार संघातून काँग्रेसकडून निवडणूक लढत आहेत. त्यामुळे आता काँग्रेसचे प्रसिद्ध चेहरे देखील पिछाडीवर असल्याचं दिसतंय.
पंजाबमध्ये १० वाजेपर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार भाजपला ४, काँग्रेसला १६ तर आपची तब्बल ८५ जागांवर आघाडीवर आहे. तर शिरोमणी दल १० जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे आता काँग्रेसची वाटचाल सत्तास्थापनेकडे होताना दिसतेय. त्यानंतर अनेक ठिकाणी आप कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरु केला आहे.
"आम्ही 'आम आदमी' आहोत पण जेव्हा 'आम आदमी' उभा राहतो तेव्हा सिंहासन हादरतं. आजचा दिवस भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाचा दिवस आहे. फक्त AAP आणखी एक राज्य जिंकणार म्हणूनच नाही तर, आप एक राष्ट्रीय शक्ती बनताना दिसत आहे. 'आप' काँग्रेसची जागा घेणार आहे" असं आम आदमी पक्षाचे पंजाबचे सहप्रभारी राघव चढ्ढा यांनी हे मत व्यक्त केलं आहे.
९:४५ वाजेपर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार आप तब्बल ८० जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस १५ आणि भाजप ५ जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे आम आदमी पक्ष हा सत्तेकडे वाटचाल करताना दिसत आहे.
काँग्रेसतर्फे मुख्यमंत्रीपद भूषवलेले कॅप्टन अमरिंदर सिंग हे सध्या पिछाडीवर चालले आहेत. नवज्योतसिंग सिद्धू यांच्यासोबत झालेल्या अंतर्गत वादामुळे त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला होता. यानंतर लोक काँग्रेस दलाची स्थापना करून ते भाजपसोबत युती करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जातंय. अमरिंदर यांनी दिल्लीत अमित शाहांची देखील भेट घेतली होती.
पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांनी सकाळीच चामकौर साहीब गुरुद्वाऱ्यातमध्ये जाऊन आपल्या कुटुंबासह दर्शन घेतलं.
नऊ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार भाजप ४, काँग्रेस २२, अकाली दल ८ तर आप तब्बल ४० जागांवर आघाडीवर आहेत.
ताज्या माहितीनुसार शिरोमणी अकाली दलाला मुकेरीयन मतदार संघात आघाडी मिळाली आहे. निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवरुन ही माहिती समोर आली आहे.
पंजाबमध्ये ११७ जागांपैकी ६३ जागांचं चित्र आतापर्यंत स्पष्ट झालं असून, यामध्ये आम आदमी पक्ष आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतं. तर त्या पाठोपाठ काँग्रेस आघाडी मिळवत असल्याचं पाहायला मिळतंय.
पंजाबमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरु झाली आहे. आतापर्यंत काँग्रेस १३ तर आप १७ जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे मुख्य लढत या दोन्ही पक्षांमध्ये असल्याचं दिसतंय.
मतमोजणीला सुरुवात होताच, काँग्रेस आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतं. काँग्रेस ८ जागांवर आघाडीवर असून, अऱखाली दल २ जागांवर आघाडीवर पाहायला मिळतंय.
पंजाबमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली असून, अकालीदल आघाडीवर असल्याचं दिसतंय. पोस्टल मतदानात शिरोमणी अकाली दलाला चांगले मत मिळाल्याचं पाहायला मिळतंय.
पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होण्यापूर्वीच आपने मोठ्या विजयोत्सव साजरा करण्यासाठी हालचाली सुरु केल्याचं पाहायला मिळतंय. आज सकाळीच आप नेते भगवंत मान यांनी गुरुद्वाराला भेट दिली. संगरुर येथील गुरसागर मस्तुआना साहीब येथे त्यांनी प्रार्थना करत आशीर्वाद घेतले.
पंजाबमध्ये ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली असून, निवडणूक आयोगाने त्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत.
२०१७ च्या निवडणुकीत कुणाला किती जागा मिळाल्या होत्या?
पंजाबच्या एकूण ११७ विधानसभा मतदार संघ असलेल्या पंजाबमध्ये यापूर्वी २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने ७६, आम आदमी पक्षाने १२, शिरोमणी अकाली दलाने १३, आणि भाजपने ६ जागा जिंकल्या होत्या. तर एक्झिट पोलच्या अंदाजांनुसार 'आप'ला यंदा पंजाबमध्ये सत्ता मिळण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे काँग्रेसनं देखील सत्ता आमचीच येईल असा दावा केला आहे. त्यामुळे ही निवडणूक मोठी चुरशीची ठरणार, हे नक्की. (Punjab Assembly Election Results 2022)
Assembly Elections Results : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. यापैकी पंजाब (Punjab) हे एक मोठं राज्य असून, काँग्रेसची (Congress) सत्ता असलेलं हे एकमेव राज्य आहे. त्यामुळे काँग्रेस आता पंजाबमध्ये सत्ता राखणार का? तीन कृषी कायद्यांमुळे (Farmers Protest) पंजाबमध्ये बॅकफुटला गेलेल्या भाजपला (BJP Punjab) किती जागा मिळणार? काँग्रेसला काटेकी टक्क देणाऱ्या आपला लोक संधी देणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरं आज मतपेट्यांमधून बाहेर येणार आहेत. त्यातच आता पेट्या उघडताच काही तासांत आपने जोरदार आघाडी मिळवली आहे. त्यानंतर आता राज्यात आपची सत्ता येणार असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.