पंजाबमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने काँग्रेसला दणका दिलाय. 1977 ते 2017 या कालावधीत काँग्रेसचा दबदबा असलेल्या मोगा मतदार संघाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून होते. बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) याची बहिणी मालविका सूद मोगा (Malvika Sood News) या मतदार संघातून (Moga Assembly Seat) काँग्रेसच्या तिकीटावर रिंगणात उतरल्या होत्या. त्यांना आपच्या उमेदवाराने 20 हजार मताधिक्याने पराभूत केले.
आतापर्यंत 15 वेळा झालेल्या निवडणुकीत 10 वेळा काँग्रेसच्या उमेदवाराने या मतदार संघात बाजी मारली होती. 2017 मध्ये या मतदार संघातून भाजपच्या हरजोत सिंह कमल यांनी विजय नोंदवला होता. आपण काँग्रेससह भाजपला दणका देण्याचे संकेत दिले आहेत. सोनू सूदची लोकप्रियताही काँग्रेसच्या बालेकिल्लात कुठेतरी फिकी पडलीये. त्याची बहिण मालविका सूद यांना याठिकाणी पराभवाचा सामना करावा लागला.
मालविका सूद यांच्यासमोर विद्यमान आमदार आणि भाजप नेता हरजोत कमल यांच्याशिवाय आम आदमी पार्टीचे उमेदवार डॉक्टर अमनदीप कौर अरोरा आणि शिरोमणी अकाली दलाच्या बरजिंदर सिंह उमेदावार रिंगणात होते. सुरुवातीपासूनच आपचे उमेदवार अमनदीप कौर आघाडीवर होते. अकाली दलाचे बरजिंदर सिंह मखन बरार दुसऱ्या तर काँग्रेसच्या मालविका सूद तिसऱ्या स्थानावर होत्या. अखेरच्या टप्प्यात कोणताही बदल झाला नाही. मालविका सूद यांना तब्बल 20 हजार मतांनी पराभव झाला.
मालविका यांनी 2005 मध्ये कॅम्पूटरमध्ये मास्टर डिग्री घेतली होती. मालविका या शिक्षिका आणि व्यावसायिक आहेत. त्यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांची संपत्ती 86,31,935 रूपयांच्या घरात होती. यात दहा लाख रूपयांची Kia Seltos कार आणि तीस तोळे सोन्याचा समावेश होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.